Tarun Bharat

बुडा कोणत्या जागेत वसाहत योजना राबविणार?

नोटिसा बजाविण्यात आलेल्या जागांवर यापूर्वीच उभारल्या इमारती

प्रतिनिधी /बेळगाव

वसाहत योजना राबविण्यासाठी झाडशहापूर, हिंडलगा, अनगोळ अशा विविध भागातील जमिनी संपादन करण्यासाठी शेतकऱयांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यामुळे हिंडलगा, अनगोळ परिसरातील शेतजमिनी संपादनाची टांगती तलवार आहे. पण बहुतांश जागांवर इमारती उभारण्यात आल्याने बुडा नेमक्मया कोणत्या जागेचे भूसंपादन करणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

शहरासभोवती असलेल्या शेतजमिनींचे संपादन करून वसाहत योजना राबविण्याचा घाट घातला आहे. याकरिता झाडशहापूर, हिंडलगा, अनगोळ अशा विविध भागातील जमिनी संपादन करण्याचा प्रस्ताव आहे. भूसंपादनासाठी यापूर्वी प्राथमिक नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. पण आतापर्यंत भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आली नाही. पण गेल्या वीस वर्षांत अनेकवेळा भूसंपादनाचा प्रयत्न करूनही बुडाला यश आले नाही. यामुळे 50ः50 या फॉर्म्युल्यानुसार योजना राबविण्याकरिता शेतकऱयांनी संमती द्यावी, अशी सूचना शेतकऱयांना नोटिसीद्वारे करण्यात आली होती. पण शेतकऱयांनी योजना राबविण्यास सहमती दर्शवली नाही. त्यामुळे बुडाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच या योजना राबविण्याकरिता भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या योजनेकरिता भूसंपादन करण्यासाठी आता पुन्हा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

भूसंपादनासाठी अनेकवेळा नोटीस बजावूनही शेतकऱयांनी भूसंपादनास विरोध दर्शविला आहे. असंख्य शेतकऱयांनी जमिनीची विक्री केली आहे. काहींनी न्यायालयात आणि सरकारदरबारी धाव घेऊन जमिनी परत मिळविण्यात यश मिळविले आहे. बहुतांश जागांवर इमारती उभारण्यात आल्याने योजना राबविण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे निदर्शनास आले आहे. हिंडलगा योजनेकरिता भूसंपादन करण्यात येणाऱया 114 एकर जमिनीपैकी 65 एकर जागा योजनेमधून वगळण्यात आली आहे. काहींनी न्यायालयात धाव घेऊन बुडाकडून ना हरकत दाखला मिळविला आहे. यामुळे जागेमध्ये इमारती निर्माण झाल्या आहेत. तसेच झाडशहापूर, अनगोळ अशा विविध भागातील जमिनींवरदेखील इमारती निर्माण झाल्याने बुडाची वसाहत योजना कोणत्या जागेत राबविणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

Related Stories

ज्येष्ठ क्रिकेटपटु बाबू खानापूरकर यांचे दुःखद निधन

Tousif Mujawar

चिदंबर पिळणकरचे दिव्यांग जलतरण स्पर्धेत यश

Amit Kulkarni

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निजद सत्तेवर येणे गरजेचे

Amit Kulkarni

सिव्हिल हॉस्पिटलमधील 30 व्हेंटिलेटर वापराविना?

Omkar B

हुतात्मा चौक गणेशोत्सव मंडळ कार्यक्रम जाहीर

Archana Banage

स्मार्ट बस स्थानकाची झाली दयनीय अवस्था

Sandeep Gawade