ऑनलाईन टीम / तरुण भारत :
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहेअधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मलासीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.
जोशी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ३१ जानेवारीपासून संसदेच्या अर्थसंकल्पीयअधिवेशनला सुरूवात होईल. सर्वसाधारण सुट्ट्यांसह ६ एप्रिलपर्यंत हे अधिवेशनचालणार आहे. अधिवेशनाच्या काळात ६६ दिवसांमध्ये एकूण २७ बैठका होतील,तर १४ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत अवकाश घेतला जाणार आहे. १२ मार्चपासूनसंसदेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. सत्राची सुरुवात लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त सत्राद्वारे होईल.
दरम्यान, अर्थमंत्री सीतारमन ३१ जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण सादर करतील. १फेब्रुवारीला त्या सलग पाचवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.