Tarun Bharat

खडकांखाली घरांची निर्मिती

सागरी चाच्यांपासून वाचण्यासाठी उपाययोजना

मानवतेचा विकास झाल्यावर लोकांचे स्थलांतर होत गेले आहे. एका ठिकाणी लोकसंख्या वाढल्यावर अन्न अन् साधनसामग्रीची कमतरता जाणवू लागते, यातून नवनव्या जागा शोधाव्या लागतात. अशा स्थितीत मानवांमधील संघर्ष सुरू होतो. असाच काहीसा प्रकार ग्रीसच्या एका बेटावर दीर्घकाळापर्यंत होत राहिला आहे. या बेटावर लोकांनी लपण्याची अशी पद्धत शोधून काढली आहे की त्यांना कुणीच शोधू शकत नव्हते. येथील लोकांनी दीर्घकाळापर्यंत असेच जीवन व्यतित केले आहे.

ग्रीसचे इकारिया बेट एजियन समुद्रात आहे. एजियन समुद्रातील इकारिया आणि अन्य बेटांवर सागरी चाच्यांचा त्रास दीर्घकालीन समस्य आहे. पहिल्या शतकापासुन येथे सागरी चाचे येत होते आणि स्थानिकांची हत्या करून सामग्री चोरून नेत होते. रोमन आणि बायजंटाइन साम्राज्यातही असे प्रकार व्हायचे. हे बेट ऑटोमन साम्राज्याच्या अंतर्गत आल्यावर येथील मूळ रहिवाशांनी सागरी चाच्यांच्या समस्येपासून मुक्तता मिळविण्याचा निर्धार केला.

येथील रहिवाशांना लढाईचे कौशल्य प्राप्त नव्हते. याचमुळे त्यांनी एक नवा पर्याय शोधला. येथील लोक बेटाच्या किनारी भागांना रिकामी करून डोंगराळ अन् जंगली भागात गेले, तेथे विशाल खडकांखाली त्यांनी स्वतःचे घर निर्माण केले. यामुळे त्यांना सागरी चाच्यांच्या नौका वेळीच दिसू लागल्याने अनेक पावले उचलता आली.

अँटी पायरेट घर या नावाने प्रसिद्ध

इकारिया बेटावर निर्माण या घरांना अँटी पायरेट घर मानले जाते. ही घरे मोठमोठय़ा खडकांखाली तयार केली जायची. समोरूनच केवळ ही घरे दिसू शकत होती. दूरवून किंवा उंच भागावरून ही घरे दृष्टीस पडणे अशक्य होते. येथे राहणारे लोक रात्रीच परस्परांना भेटायचे. रात्रीच्या वेळी आग पेटवत नव्हते. याचबरोबर त्यांना श्वानही पाळता येत नव्हते. पायरेट एरा नावाने प्रसिद्ध सुमारे 3 दशकांपर्यंत येथे लोक राहत होते.

Related Stories

बॉम्ब शेल्टर्सकरता युक्रेनकडून अनोखी युक्ती

Patil_p

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन रुग्णालयात दाखल

prashant_c

दक्षिण कोरिया दक्ष

Patil_p

यूनिफिकेशन चर्चशी संबंध, अर्थमंत्र्याचा राजीनामा

Patil_p

जर्मनीत नवे रूग्ण

Patil_p

इस्रायलमध्ये योगदिन उत्साहात साजरा

Amit Kulkarni