Tarun Bharat

इमारत बांधकाम परवानगीचे कामकाज चार दिवस ठप्प

Advertisements

डाटा पूर्ण क्षमतेने भरल्याने सर्व्हरडाऊनची समस्या

प्रतिनिधी /बेळगाव

इमारत बांधकाम परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागत आहेत. मात्र ऑनलाईन प्रणालीतील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सर्व्हरवरील डाटा पूर्ण क्षमतेने भरल्याने सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे आता चार ते पाच दिवस इमारत बांधकाम परवानगीची प्रक्रिया ठप्प राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

इमारत बांधकाम परवानगीसाठी ‘ई-निर्माण’ या प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागतो. 2400 चौरस फुटाहून अधिक बांधकाम परवानगीसाठी मुख्य कार्यालयात अर्ज करावे लागतात. तर 2400 चौरस फुटापेक्षा कमी आकाराच्या बांधकाम परवानगीसाठी विभागीय सार्वजनिक बांधकाम कार्यालयात परवानगी दिली जाते. पण सध्या ऑनलाईन प्रक्रिया विविध तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांसाठी डोकेदुखीची ठरू लागली आहे. वारंवार सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण होत असल्याने अर्जदारांना बांधकाम परवानगीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सर्व्हरवरील डाटा पूर्ण क्षमतेने भरला असल्याने सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण झाली आहे. संपूर्ण राज्यासाठी एकच सर्व्हर असल्याने संपूर्ण राज्यात इमारत बांधकाम परवानगीचे काम ठप्प झाले आहे.

सर्व्हरडाऊनमुळे इमारत बांधकाम परवानगीसाठी अर्ज करता येत नाही किंवा कागदपत्रांची पूर्ततादेखील करता येत नाही. दुरुस्तीसाठी चार ते पाच दिवस सर्व्हरडाऊन राहणार असून नागरिकांना बांधकाम परवानगीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Related Stories

हुतात्मा दिनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हा

Patil_p

पंचमसाली समाजाचा प्रवर्ग-2 मध्ये समावेश करा

Amit Kulkarni

नौसेनेच्या ताब्यात असलेले अंजदीव बेट पुन्हा चर्चेत

Amit Kulkarni

राज्य फुटबॉल स्पर्धेत संत मीराला दुहेरी मुकुट

Amit Kulkarni

रस्त्यावर चलनी नोटा टाकण्याचे प्रकार सुरूच

Patil_p

रामनगर-धारवाड मार्गावर कारची झाडाला धडक : दोघेजण जखमी

Omkar B
error: Content is protected !!