ऑनलाईन टीम/तरुण भारत
Buldhana Crime : मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून सांगली येथे चार साधूंना मारहाण झाल्याची घटना ताजी असतांनाच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे काल (१४ सप्टेंबर) सायंकाळी लहान मुले चोरणारी महिला समजून एका तृतीयपंथियाला (Transgender) जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाण प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक केली आहे. तर तीन जण अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
दरम्यान, बुलढाणा येथे एका तृतीयपंथीय महिलेला मुले चोरणारी महिला समजून जमावाने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी यची दखल घेत मारहाण करणाऱ्या ५ जणांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
हे ही वाचा : साधू मारहाण प्रकरणी ६ जणांना अटक, भाजपकडून निषेध
सायरा नावाची तृतीयपंथी अकोट येथील फॅशन शो बघून मलकापूरकडे परत जात होती. जळगाव जामोद येथील जुना बस स्टँड परिसरात जमावाने मुले चोरणारी टोळीतील महिला समजून या तृतीयपंथियाला बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर जमावाने या तृतीयपंथियाला मारहाण करत पोलीस स्टेशनमध्ये नेलं. चौकशी केली असता या तृतीयपंथियाचा मुले चोरणाऱ्या टोळीशी संबंध नसल्याचं समोर आलं. आता या तृतीयपंथियाने जळगाव जामोद पोलिसात तक्रार देऊन मारहाण करणाऱ्या जमावाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. जळगाव जामोद पोलिसांनी आतापर्यंत व्हिडीओत दिसणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतलं असून इतर मारहाण करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान सायराला बेदम मारहाण केल्यामुळे तिला जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.