Tarun Bharat

तुमचे भवितव्य ठरवणारे दिल्लीत बसलेत; उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेंवर टीकास्त्र

ऑनलाईन टीम/तरुण भारत

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आज शिवसेनेच्या वतीने शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)) या मेळाव्याला उपस्थिती लावली. तसेच यावेळी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं. ज्याला स्वत:चेच भविष्य माहित नाही, ते आपले भविष्य ठरवणार. आहो तमची हात की सफाई संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. तुमचे भविष्य जे आहे. कुडबुडे जोतिषाला विचारून उपयोग नाही. तुमचे जोतिषी किंवा तुमचे भवितव्य ठरवणारे दिल्लीत बसलेत, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाते प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला.

“बुलढाण्यात जिथं जिजाऊंच जन्मस्थान आहे तिथे माझी सभा होईल हे मी सांगितलं होतं. मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचा आशीर्वाद घेऊनच गाडायची आहे. संविधान दिन आहे. संविधान दिन म्हटल्यावर काय म्हणायचं हा प्रश्न आहे. हे संविधान आज सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते. मी आणि प्रकाश आंबेडकर एका मंचावर आलो होतो. त्यांनी जो प्रश्न विचारला होता तो माझ्या मनात नाही सर्वांच्या मनात असला पाहिजे. कारण आज लोकशाही वाचवण्याची गरज आहे. आज हुकूमशाही हवी की लोकशाही हा प्रश्न आहे.”

दरम्यान, चिखली इथल्या तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शनिवारी संध्याकाळी ५ वाजता शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे सरकारवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “आपला दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला. तेव्हाच ठरवलं की, यापुढची पहिली सभा जिजाऊ यांच्या बुलढाण्यातच घेईन. कारण मराठी मातीमधली गद्दारी गाढायची असले, तर जिजाऊंचे आशिर्वाद घेऊन पुढे गेलो पाहिजे. म्हणून मी आज इथे सभा घेतोय”

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज भारतीय संविधान दिन आहे. मात्र या दिनाच्या शुभेच्छा देताना सध्या देशात हे संविधान सुरक्षित आहे का, असा प्रश्न पडतोय. चार ते पाच दिवसांपूर्वी त्यांनी एक प्रश्न विचारला होता. आपल्याला लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करायची आहे. त्यामुळे तुम्हाला लोकशाही पाहिजे की, हुकूमशाही हे आता तुम्हीच ठरवा”

Related Stories

कोल्हापूर : कळंब्यातील जुगार अड्यावर छापा ; शस्त्रासह सुमारे ७ लाखाचा मुद्देमाल जप्त

Archana Banage

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राजमार्गावर स्फोट; 2 जखमी

datta jadhav

दिल्लीच्या रोहिणी कोर्टात गोळीबार; गँगस्टरसह चौघांचा मृत्यू

datta jadhav

Special Story; रणजी ट्रॉफी : मध्यप्रदेशचा बलाढ्य मुंबईवर विजय

Kalyani Amanagi

साताऱयातून भाजपाचाच खासदार संसदेत जाणार

Patil_p

पुणे विभागातील 87,736 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar