Bulk Drug Park: वेदांता -फाॅक्सकाॅन प्रकलपावरून गेली दोन दिवस विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, वेदांता -फाॅक्सकाॅन नंतर आता ‘बल्क ड्रग पार्क’ हा औषध निर्मितीचा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला, उद्योग मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना याची माहिती आहे का? असा सवालच आदित्य ठाकरे यांनी विचारला. ठाकरेंच्या या प्रश्नाला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. मला याच्यात राजकारण करायचं नाही. कोणी राजकराण केलं तर त्यांचेच मुखवटे फाटतील असा टोला शिंदेंनी लगावला.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, गेल्या अडीच वर्षामध्ये काय परिस्थिती होती. कोणला कोण भेटत होत? काय करत होत ? कुठली इंडस्ट्री वाढवण्यासाठी कोणी किती आणि कुठं बैठका घेतल्या? याला जबाबदार तेच आहेत असे उलट प्रश्न शिंदेंनी विचारले. पुढे बोलताना ते म्हणाले, मला याच्यात राजकारण करायचं नाही. कोणी राजकराण केलं तर त्यांचेच मुखवटे फाटतील. दौरे करुन काय होत नाही. प्रत्यक्ष काम करावं लागतं. असा टोला ही एकनाथ शिंदेंना लगावला.
आदित्य ठाकरे नेमके काय म्हणाले
सध्याचे मुख्यमंत्री घरोघरी जाऊन भेटी देत आहेत. अनेक ठिकाणी फिरत आहेत. पण या मुख्यमंत्र्यांना आणि उद्योग मंत्र्यांना देखील हा विषय माहिती नसेल की, हा मोठा प्रोजेक्ट जो महाराष्ट्रासाठी उपयोगी होता त्यावर महाराष्ट्राचा पहिला हक्क होता, तो महाराष्ट्रातून निघून गेलेला आहे. हे किती खरं आणि किती खोटं याचं उत्तर मला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून अपेक्षित आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, बल्क ड्रग पार्कसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला होता. हा प्रकल्प देखील आपण रायगड आणि इतर परिसरात आणणार होतो. यासाठी हिमाचल प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांनी प्रस्ताव पाठवले होते. पण आता गुजरातमधील भरुच इथं हा ‘बल्क ड्रग पार्क’ होणार आहे. या प्रकल्पाची मागणी महाराष्ट्रानं पहिल्यांदा केली होती. सप्टेंबरमध्ये हा प्रकार घडला होता. असेही ते म्हणाले.


previous post