Tarun Bharat

कडोलीत लम्पीने बैलाचा मृत्यू

प्रादुर्भाव कायम, खबरदारीची गरज

प्रतिनिधी/ बेळगाव

लम्पी रोगाच्या साथीने कडोली येथे शुक्रवारी रात्री एका बैलाचा मृत्यू झाला असून कडोली पशु आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील हा 6 वा बळी ठरला आहे. त्यामुळे नागरिकांनी जनावरांची योग्य काळजी घेऊन वेळीच उपचार करून घ्यावेत, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार गंगारेड्डी यांनी केले आहे.

लम्पी रोगाचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असून विशेष करून बैल आणि गायींना या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. कडोली पशु आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात रोगाचा म्हणावा तसा फैलाव झाला नाही. खबरदारी म्हणून आरोग्य केंद्राच्यावतीने जवळपास 20 गावातून 6100 बैल आणि गायींना रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. तरीदेखील मण्णिकेरी येथे दोन, कट्टणभावी येथे दोन, म्हाळेनट्टी येथे एका जनावराचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी कडोली येथे लक्ष्मी गल्लीत रतन शिवराय पाटील यांचा बैल लम्पीने मृत्युमुखी पडला आहे. कडोलीतील हा पहिल्या बैलाचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांनी आता फार सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. रोगाची लक्षणे दिसताच तात्काळ पशु आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा आणि जनावरांवर वेळीच उपचार करून घ्यावेत, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार गंगारेड्डी यांनी केले आहे.

Related Stories

आर्ट्स सर्कलची वार्षिक सर्वसाधारण सभा लांबणीवर

Omkar B

बाग परिवारातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त कविता सादरीकरण

Amit Kulkarni

हमाल कर्मचाऱयांना पीएफ, सामाजिक सुरक्षा द्या

Amit Kulkarni

झारखंडहून परतलेल्या वृद्धाला कोरोना

Patil_p

प्रवाशांच्या संख्येत धिम्यागतीने वाढ

Amit Kulkarni

बेळगावची सुकन्या बनली स्वित्झर्लंडमध्ये ‘कोरोना योद्धा’

Patil_p