Tarun Bharat

देशात 2026 मध्ये धावणार बुलेट ट्रेन

Advertisements

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती ः प्रवाशांच्या सुविधा वाढविण्यासाठी अनेक उपाययोजना

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्र सरकार जनतेला मिळणाऱया सुविधा वाढविण्यासाठी अहोरात्र झटत आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी सरकारकडून वेळोवेळी सकारात्मक निर्णय घेतले जात असल्याचे स्पष्ट करतानाच देशात 2026 पासून बुलेट टेन सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना दिली. केंद्र सरकारने रेल्वे प्रवाशांच्या सुविधा वाढविण्यासाठी अनेक पावले उचलली असून त्याचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी बिझनेस टीव्ही चॅनेलच्या एका कार्यक्रमात रेल्वे मंत्रालयाशी संबंधित विविध प्रकल्प-योजनांचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी विरोधक जरी सरकारच्या योजना आणि पावले यांना भाषणबाजी म्हणत असले तरी सरकार जनकल्याणकारी योजनांबाबत गंभीर असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 8 वर्षांत उचललेल्या पावलांचे परिणाम आता दिसू लागले आहेत. देशाच्या विकासाला आता गती येऊ लागली आहे. रेल्वे मंत्रालयांतर्गत प्रवाशांच्या हितार्थ अनेक प्रकल्पांना गती दिली जात आहे. मेट्रो रेल्वेपाठोपाठ आता बुलेट टेन चालविण्याचे काम वेगाने सुरू असून देशातील पहिली बुलेट टेन 2026 मध्ये धावू शकते, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

रेल्वे तिकीटदर वाढवणार नाही!

रेल्वेने बरेच दिवस भाडे वाढवलेले नाही. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन सध्या भाडेवाढ करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. भारतीय रेल्वे मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजनांवर काम सुरू आहे. त्यांचे परिणामही लवकरच समोर येतील, असे अश्विनी वैष्णव म्हणाले. स्टार्टअपच्या बाबतीत भारत संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर आहे. स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. एवढेच नाही तर त्यांना बळ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारत येत्या अडीच वर्षांत सेमीकंडक्टरमध्ये स्वयंपूर्ण

येत्या अडीच वर्षांत भारतात सेमीकंडक्टरचे उत्पादन सुरू होईल. देशासाठी हा एक मोठा उपक्रम आहे. सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रात जगभर प्रसिद्ध असलेल्या बेल्जियमच्या एका संस्थेनेही भारताच्या सेमीकंडक्टर कार्यक्रमाचे कौतुक केले असून या संस्थेकडून आम्हाला मदतही मिळत आहे, असेही त्यांनी याप्रसंगी नमूद केले.

Related Stories

पंजाब : 802 नवे कोरोना रुग्ण; 31 मृत्यू

Rohan_P

योगी आदित्यनाथांचा 25 रोजी शपथविधी

Amit Kulkarni

अफगाण मुद्यावर आज सर्वपक्षीय चर्चा

Patil_p

कोटद्वार मतदारसंघाची ऋतू खंडुरींना उमेदवारी

Amit Kulkarni

भारत-चीनमधील 13 व्या फेरीची चर्चा निष्फळ

Patil_p

इतर संघर्ष बिंदूंवरून सैन्यमाघारीचा निर्णय

Patil_p
error: Content is protected !!