जावेद शेख भिलवडी, शिरीष शिक्षपाल यांची बैलगाडी, तर शुभम रजपूत सांगली यांची घोडा गाडी प्रथम
पलूस/प्रतिनिधी
पलूस येथील ग्रामदैवत समर्थ धोंडिराज महाराज यांच्या यात्रेनिमित्त बैलगाडी घोडागाडी शैर्यतीचे आयोजन या शैर्यतीत अ गटात जावेद शमशूद्दीन शेख भिलवडी यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. तर कै. आकाश पाटील यांचे स्मारणार्थ भरत पाटील यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचे 15,555 रुपये बक्षीस आणि कायम ढाल प्रथम क्रमांकासाठी देण्यात आले. मच्छिद्र संभाजी पाटील यांच्या बैलगाडीने दुसरा क्रमांक मिळवला व खन्डोबा अर्थमूव्हर्स चे सूरज माळी यांच्या वतीने 10,000 रुपये बक्षीस व ढाल हे बक्षीस दिले. खंडू राजाराम खिलारे दणोळी यांच्या बेलगाडीने तिसरा क्रमांक मिळवला व कै रंगराव दत्तात्रय पाटील यांचे स्मरणार्थ अशोक पाटील यांचे वतीने ठेवलेले 7,000 हजार रुपये दिले.
ब गटात शिरीष शीशपाल शिरगावे कवठेपीरान यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला व प्रकाश ऊर्फ सोन्या शिसाळ सचिन बकरे यांच्या वतीने ठेवण्यात आलेले 10,000 हजाराचे इनाम पटकावले. द्वितीय क्रमांक नागेश बाळासो पाटील अमनापूर यांच्या बैलगाडीने मिळवला व अमर शिसाळ संजय जाधव यांच्या वतीने ठेवण्यात आलेले 7,000 हाजाराचे इनाम पटकावलेतर तृतीय क्रमांक उदय नामदेव घोरे कुकटोळी यांच्या बैलगाडीने पटकावला आणि सुनील बकरे यांच्या वतीने ठेवण्यात आलेले 5,000 रुपयांचे इनाम पटकावले.
घोडागाडी शर्यतीत शुभम सतीश रजपूत यांचे गाडीने प्रथम क्रमांक पटकावला व शिवशक्ती ग्रुपच्या वतीने ठेवण्यात आलेले 7,000 हजराचे इनाम पटकावले ,सर्जेराव यशवंत बंडगर यांच्या घोडागाडीने द्वितीय क्रमांक मिळवला व नंदकुमार मोरे व संदीप बकरे यांच्या वतीने ठेवलेले 5,000 रुपयांचे इनाम पटकावले त्रितीय क्रमांक मुबारक चाऊस यांच्या घोडा गाडीने पटकावला आणि राजेंद्र आलंदर यांच्या वतीने ठेवण्यात आलेले 3,000 हजाराचे इनाम पटकावले.
या शर्यतीचे उद्घाटन पलूस सहकारी बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांचे हस्ते करण्यात आले यावेळी समर्थ धोंडिराज महाराज सार्वजनिक ट्रस्ट चे सर्व संचालक पलूस पंचायत समितीचे माजी सभापती अमर इनामदार वासुदेव देशमुख वैभव येसुगडे ट्रस्टचे सचिव संतोष पाटील इंद्रजित इनामदार यात्रेकरू मोठ्या संख्येने उपस्थित होते या शर्यतीचे समालोचन जगदीश पाटील यांनी केले.