गुवाहाटी/ वृत्तसंस्था
बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्याप्रमाणेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी देखील जसप्रित बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर फेकला गेलेला नाही, या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ‘मी बुमराहचा वैद्यकीय अहवाल अद्याप पाहिलेला नाही. याबाबत, तज्ञांचे मत काय आहे, यावर मी अधिक अवलंबून आहे. सध्या त्यांनी बुमराह द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत खेळणार नाही, असे म्हटले आहे. वर्ल्डकपमध्ये तो खेळणार का, याबद्दल ऑफिशियल कन्फर्मेशनची आम्हाला प्रतीक्षा आहे’, असे द्रविड याप्रसंगी म्हणाले. यंदाची आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा दि. 16 ऑक्टोबरपासून खेळवली जाणार असून भारतीय संघ यासाठी दि. 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.