Tarun Bharat

टी-20 वर्ल्डकपमधून बुमराह बाहेर : बीसीसीआय

Advertisements

नवी दिल्ली : आघाडीचा स्टार गोलंदाज जसप्रित बुमराह पाठदुखीमुळे आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही, यावर बीसीसीआयने सोमवारी शिक्कामोर्तब केले. बुमराह बॅक स्ट्रेस प्रॅक्चरमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही, असे वृत्त पीटीआयने दि. 29 सप्टेंबर रोजी दिले होते. त्यावर जय शाह यांच्या घोषणेमुळे शिक्कामोर्तब झाले.

‘बुमराह वर्ल्डकप खेळू शकणार नाही, असे बीसीसीआय वैद्यकीय पथकाने म्हटले आहे. तज्ञांशी चर्चेनंतर हा निर्णय जाहीर केला जात आहे’, असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी नमूद केले. बुमराह सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेतही खेळू शकलेला नाही. आता मुख्य संघात बुमराहऐवजी मोहम्मद शमी किंवा दीपक चहर यांच्यापैकी एका गोलंदाजाचा समावेश केला जाऊ शकतो. उमरान मलिकला राखीव खेळाडूत समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी केकेआर सज्ज

Patil_p

‘त्या’ रोमांचक लढतीत स्टोक्सने घेतला होता ‘सिगारेट ब्रेक’!

Patil_p

विराज मदप्पा, रशीद, अवनी यांना आशियाई स्पर्धेचे तिकीट

Patil_p

पाकचा बांगलादेशवर मालिका विजय

Patil_p

ऍश्ले बार्टी यंदाची ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम सम्राज्ञी

Patil_p

तिरंदाज प्रशिक्षक सदस्याला कोरोनाची बाधा

Patil_p
error: Content is protected !!