तीन घरफोड्यांचे लागला छडा
प्रतिनिधी/ बेळगाव
येरगट्टी नगरपंचायतीच्या अखत्यारित येणाऱ्या गुदीगोप्प या परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्याला मुरगोड पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 3 लाख 30 हजार रुपये किमतीचे सोने, 15 हजार किमतीची चांदी आणि रोख 8 हजार 300 रुपये जप्त केले आहेत.रामदुर्गचे डीएसपी रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगोडचे पोलीस निरीक्षक मौनेश्वर माळी पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.