अक्कलकोट / प्रतिनिधी
तालुक्यातील हन्नुर येथे अज्ञात चोरट्यांनी चार घरे फोडून सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा सुमारे 74 हजाराची घरफोडी झाली. ही घटना 7 ऑगस्टच्या सकाळी सात वाजण्याच्या झाली. याची अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद विठ्ठल विश्वनाथ पारतनाळे वय 42 रा.हन्नुर यांनी दिली असून फिर्यादीची दोन घरे आहेत. गणपती उत्सव असल्याने गावातील घरात गणेश मुर्तीची स्थापना केली असल्याने ते गावातील घरात मुक्काम करत होते. त्यांच्याकडे दोन गाई होत्या आणि त्या दोन दिवसापुर्वीच 28 हजार रुपयेला विक्री केली होती. त्याचे पैसे भुताळसिध्द मंदीराजवळ असलेल्या घरात ठेवलेले होते. दि 6 रोजी ही सायंकाळी 7 वाजता भुताळसिध्द मंदीराजवळील घराला कुलुप लावुन नेहमीप्रमाणे गावातील घरी मुक्कामास आले. दि 7 रोजी सकाळी 7 च्या सुमारास फिर्यादीचा मुलगा ओंकार व दयानंद हे शाळेचे कपडे घेण्याकरीता झोपडपट्टीतील घरी गेले होते. थोड्याच वेळात मुलगा ओंकार हा चालत घरी आला व त्याने सांगीतले की आपल्या घराचे कडीकोयंडा तुटुन पडला असुन घराचा दरवाजा उघडा आहे व घरातील सामान अस्ताव्यास्त पडलेले आहे. असे सांगीतल्यावर फिर्यादी परतनाळे ताबडतोब झोपडपट्टीतील घराकडे जावुन पाहीले असता तेथे घराचा दरवाजा उघडा दिसला व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले व देवळीत कपाटात ठेवलेले भांडे हे पलंगावर उघडे दिसले डब्यात ठेवलेले 28000/- रु तपासुन पाहीले असता ते ठेवलेल्या ठिकाणी मिळुन आले नाही. स्टील डब्यात ठेवलेले रू.12000 चे सोन्याचे दागीने ही आढळुन आले नाही. अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्याचे दागीने यांची चोरी केली आहे. तसेच गावातील विश्वनाथ शंकर तळवार यांचे रू.24000 रुपयाचे सोने व जानकाबाई ओंकारी जडगे यांचे रोख दहा हजार रुपये याचीही अज्ञात चोरट्याने चोरी केली. चांद साहेबलाल शेख यांचेही घर फोडले पण चोरट्याला तेथे काही मिळाले नाही. अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस हवालदार राजाराम फुलारी हे करीत आहेत.