प्रतिनिधी/ बेळगाव
सरस्वतीनगर-गणेशपूर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे 40 हजार रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. शनिवारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. प्रदीप अष्टेकर यांच्या घरी ही घटना घडली असून यासंबंधी कॅम्प पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. शनिवारी रात्री कॅम्प पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.