12 हजार 300 रु. रोकड लंपास, चांदीचे ब्रेसलेटही पळविले
वार्ताहर /जांबोटी
खानापूर तालुक्मयाच्या ग्रामीण भागात वाढत्या घरफोडय़ांचे सत्र सुरूच असून वडगाव-जांबोटी येथे शनिवारी दुपारी बंद घराचा मागील दरवाजा फोडून चोरटय़ांनी आत प्रवेश करून रोख रक्कम लांबविल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
वडगाव-जांबोटी येथील जोतिबा बाबू महाजिक यांचे डुक्कर होंडा रस्त्यावर राहते घर आहे. ते मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी घराला कुलूप लावून कामासाठी गेले होते. त्यांची आईही शेतात मजुरीला गेली होती. घरात कोणी नसल्याचे पाहून शनिवारी दुपारी चोरटय़ानी घराचा मागील दरवाजा फोडून घरात प्रवेश केला. चोरटय़ानी घरातील कपाट फोडून कपडे व इतर संसारपयोगी साहित्य अस्तव्यस्त केले. तिजोरीमध्ये ठेवलेले 12 हजार रुपये रोख तसेच पिठाच्या डब्यामध्ये ठेवलेले 300 रुपये असे एकूण 12,300 रुपये रोख व एक चांदीचा दागिना असा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे वडगाव ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.
शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान ज्योतिबा महाजिक हे कामावरून घरी आल्यानंतर घराचा मागील दरवाजा फोडून चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सुनील देसाई यांना दिली. त्यानंतर घटनेची माहिती जांबोटी पोलिसांना कळविल्यानंतर रात्री खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व सहकाऱयांनी वडगाव-जांबोटी गावाला भेट देऊन या घटनेची पाहणी केली. मागीलवषीदेखील वडगाव गावात घरफोडी झाली होती. त्यामुळे घबराट पसरली आहे.
घराजवळ नंबरप्लेट नसलेली स्प्लेंडर मोटारसायकल पाहिल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यामुळे चोरटे बाहेरूनच आल्याचा अंदाज आहे. पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी घटनेची पहाणी करून वडगाव ग्रामस्थांच्या बोलविलेल्या बैठकीत जाबोटी परिसरात घरफोडीच्या घटना वाढल्या असून नागरिकांनी सतर्क राहावे व प्रत्येक गावात ग्राम पंचायतीने सीसी कॅमेरे बसवावे, असे आवाहन केले.