सलग तिसऱ्या दिवशी घरफोडी : नागरिकात घबराट : पोलिसांनाच चोरट्यांचे आव्हान
गोकुळ शिरगाव/वार्ताहर
उजळाईवाडी (ता.करवीर) या गावात वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांच्या मनात भीतीच वातावरण आहे. गोकुळ शिरगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उजळाईवाडीत दिवसा ढवळ्या अद्यात चोरट्यांनी सलग तीन दिवस घरफोड़या करुन लाखो रुपयचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कमेवर डला मारला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोऱ्या करणाऱ्या टोळीचे दर्शन झाले आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार वाढत असल्याने चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
उजळाईवाडीत सलग तिसऱ्या दिवशी घरफोड्या झाल्याने नागरिकांच्या मनात चोरांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. गाव व उपनगरात चोर्या, घरफोड्यांबरोबरच जबरी चोरीच्या घटना घडत आहेत. गावात सलग तीन दिवस वाढत्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे चोरी सत्र थांबेनासे झाले आहे.
उजळाईवाडी येथे २७ व २८ तारखेला शरद किशोर इंगवले रा. श्री राम कॉलनी, उजळाईवाडी याच्या घरी चोरट्यांनी बंद दाराचा कडी कोयंडा तोडून घरातील एक तोळ्याचे ४५ हजाराचे दागिने व रोख २० हजार रुपये चोरट्यानी चोरी केले आहेत. या बाबत पोलिसात नोद झाली आहे. तर दोन दिवसापूर्वी उजळाईवाडी येथील ट्रक गॅरेज मालक विलास शंकर आरगु (गणेश कॉलनी, सरकार चौक) व अनिल सर्जेराव भोसले (इंडो काउंट कॉलनी) हे दोघेजण कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेले असता २५ सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते २६ सप्टेंबर सकाळी साडेदहा व दुपारी एक च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोयंडा तोडून प्रवेश करीत तिजोरीतील व कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळवली आहे. सततच्या चोरीमुळे पोलिसांनी चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा आशी मागणी नागरीका मधून होत आहे.
आज गोकुळ शिरगाव मध्ये झालेली तिसरी नोंद उजळाईवाडी (ता.करवीर) पसरिचा नगर येथील श्रीमती कल्पना अर्जुन देवकुळे ( वय-५२)रा.प्लॉट न ११९ पसरिचा नगर, उजळाईवाडी याच्या राहत्या घरी दि.२२ ते २९ रोजी सकाळी ८ च्या दरम्यान घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दाराचा कडी कोयंडा उचकटुन तिजोरीतील ६० हजाराची चेन, कर्ण फुले, सोने, रोख १० हजार असे मिळुन ७० हजाराची चोरी चोरट्यांनी केली आहे. अत्यंत संवेदनशील असलेल्या पोलीस वसाहत परिसरामध्येही चोरट्यांनी एंट्री करत सर्व सामान्य लोकांच्या घराना लक्ष केले आहे.
गोकुळ शिरगांव पोलिस ठाण्याच्या वतीने सदर गावात गस्त वाढविण्यात येत आहे. तसेच घराशेजारील लोकांनीही अनोळखी व्यक्तीच्या चोरीच्या उद्देश्याने हालचाली दिसून आल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. कॉलनीतही सीसी टी व्ह कमरे लावण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत. लवकरच चोरट्यांच्या बंदोबस्त करण्यात येईल. अविनाश माने सपोनि, गोकुळ शिरगांव पोलिस ठाणे