Tarun Bharat

Kolhapur : मणेरमळ्यात घराचा कडी कोयंडा उचकटून चोरी; ३ लाख १६ हजाराचा मुद्देमाल लंपास

उचगाव/ वार्ताहर

उचगाव पैकी मणेरमळा बाबासाहेब पाटील कॉलनी येथे घराचा कडी कोयंडा उचकटून घरातील लोखंडी व लाकडी कपाटाच्या तिजोरीचे दार तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे व चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण तीन लाख सोळा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी चोरीची घटना घडली.

नामदेव मसु बेलवळेकर (वय ६५ मुळ गाव. कुरुकली ता. कागल सध्या, रा. बाबासाहेब पाटील कॉलनी मणेर मळा उचगाव तालुका करवीर) यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्याद दिली. नामदेव बेलवळेकर यांच्या घरातील देवकार्यासाठी बाहेर गेले होते तर नामदेव बेलवळेकर हे घराच्या वरच्या मजल्यावर झोपले होते. यावेळी घराच्या खालच्या मजल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील तिजोरी फोडून त्यातील सोन्याचा कोल्हापुरी साज, झुबे, सोन्याची चेन, अंगठ्या, लॉकेट, लहान मुलाचे ब्रेसलेट, चांदीची बिंदिया ,चांदीचे ताट असे तीन लाख सहा हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दहा हजार रुपये असा एकूण 3 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लंपास केला. विशेष बाब म्हणजे मणेर मळ्यात पोलिसांची गस्त चालू होती. तरीही चोरट्याने चोरी करण्याचे धाडस दाखवून गांधीनगर पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. याबाबत गांधीनगर पोलिसांत चोरीचा गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले करीत आहेत.

Related Stories

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब

Archana Banage

दातृत्वाचे हात सरसावले… पाणी टंचाईतही `वडणगे पॅटर्न’

Archana Banage

कोल्हापूर : व्हाट्सअप चॅटिंगमध्ये शिवीगाळ, एकावर तलवार हल्ला

Archana Banage

कोल्हापूर : पेठ वडगाव पालिका स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये देशात बाराव्या क्रमांकी

Archana Banage

गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमात

Archana Banage

कोरोनाच्या लढ्यातील पोलीस नव्या नियमांच्या कात्रीत

Archana Banage