तरुण भारत

बेळगावात घरफोडय़ांचे सत्र सुरूच

राणी चन्नम्मानगर, शिवाजी कॉलनी येथे दोन घरे फोडली

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

बेळगाव शहर व उपनगरांत चोऱया, घरफोडय़ांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे साहजिकच पोलीस दलाची डोकेदुखी वाढली आहे. गुन्हेगारांच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. गुन्हेगार मात्र सापडत नाहीत, अशी परिस्थिती आहे. राणी चन्नम्मानगर व शिवाजी कॉलनी, टिळकवाडी येथे दोन बंद घरे फोडल्याचे उघडकीस आले आहे.

संगमेश्वरनगर येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून 1 किलो सोन्याचे दागिने चोरल्याची घटना ताजी असतानाच शहरात खासकरून उपनगरांत आणखी घरफोडय़ा घडल्या आहेत. अनेक ठिकाणी गुन्हेगारांच्या छबी सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र या सराईत गुन्हेगारांनी पोलिसांना चकवा देत चोऱया, घरफोडय़ा सुरूच ठेवल्या आहेत.

डिफेन्स कॉलनी, राणी चन्नम्मानगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे 4 लाखांचा ऐवज पळविला आहे. यासंबंधी गुरुवारी रात्री दशरथ आत्माराम सावंत यांनी उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. चोरटय़ांनी सुमारे 80 ग्रॅमहून अधिक सोन्याचे दागिने, 49 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज पळविला आहे. 6 मे रोजी सावंत आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. बुधवार दि. 11 मे रोजी ते घरी परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. उद्यमबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दुसरी घटना शिवाजी कॉलनी, टिळकवाडी येथे उघडकीस आली आहे. सुरजितकुमारसिंग रजपूत यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे 9 लाख रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने चोरटय़ांनी पळविले आहेत. घटनेची माहिती समजताच टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

10 एप्रिल 2022 रोजी सुरजितकुमारसिंग हे आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. गुरुवार दि. 12 मे रोजी एक महिन्यांनंतर ते आपल्या घरी परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत. टिळकवाडी पोलिसांनी गुरुवारी अनेक ठिकाणी नागरिकांच्या बैठका घेऊन जागृतीची मोहीमही हाती घेतली होती.

ऑटोरिक्षातून बॅग पळविली

मारुती गल्ली येथे उभी करण्यात आलेल्या एका ऑटोरिक्षातील बॅग पळविण्यात आली आहे. भिक्षुकाच्या वेशात आलेल्या एक मुलगा व एका महिलेने हे कृत्य केल्याचा संशय आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून हा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या बॅगमध्ये 50 हजार रुपये रोख रक्कम व दागिने होते. यासंबंधी खडेबाजार पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

हलग्याच्या शेतकऱयाची आत्महत्या

Patil_p

विमनस्क महिलेजवळ सापडले गोंडस बाळ

Amit Kulkarni

गजानन महाराजनगरात नाला स्वच्छता मोहीम सुरू

Amit Kulkarni

‘आठवडी’मध्ये निर्बंध, ‘घाऊक’मध्ये फज्जा

Omkar B

अनगोळ येथे 22 जुगाऱयांना अटक

Rohan_P

प्रजासत्ताकदिनी कॉलेजमध्ये होणार सूर्यनमस्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!