Tarun Bharat

सावंतवाडीत घरफोडीचे सत्र सुरूच

उभा बाजार शिवाजी पुतळ्यानजीक सेवानिवृत्त तलाठी महेश शेणई यांच्या बंद बंगल्यात चोरी

प्रतिनिधी /सावंतवाडी

Advertisements

सावंतवाडी पुन्हा घरफोडीचे सत्र सुरूच असून उभा बाजार शिवाजी पुतळ्यानजीक सेवानिवृत्त तलाठी महेश शेणई यांच्या बंद बंगल्यात झाली आहे. चोरट्याने कपाटे लॉकर फोडून आतील चांदीच्या वस्तू लंपास केल्या आहेत. मात्र चोरट्याच्या हाती रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने न लागल्याने त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.

शेणई हे एक महिन्यापूर्वी कुटुंबासमवेत पुणे येथे गेले होते चोरीचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला असावा अशी शक्यता आहे. हा प्रकार आज सकाळी तिथून जाणाऱ्या लहान मुलीच्या लक्षात आला. त्यानंतर या घटनेची माहिती तिने आईला दिली. दिल्यानंतर शेणई हे आज गुरुवारी सावंतवाडीत आले. तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक शंकर कोरे व त्यांच्या टीमने धाव घेत पाहणी केली.चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजा जवळ ठेवलेली दुचाकी व आतील एलईडी टीव्ही अशा अन्य वस्तूला हात न लावता रक्कम सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हाती मिळण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धाव घेतली.

Related Stories

महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचा निर्धार

NIKHIL_N

आजपासून घुमणार शिमग्याचा ढोल..!

Patil_p

चिपळुणातील गुटखा विक्रीवर कारवाई करणार

Patil_p

मुटाटला डोंगर खचला, जमीन दुभंगली

NIKHIL_N

मुंबई – गोवा हायवेवरील कणकवली उड्डाण पुलाचा भाग कोसळला

Rohan_P

मिलिंद नार्वेकरांनी आपल्या बंगल्याचे बांधकाम स्वतःच तोडले

Patil_p
error: Content is protected !!