Tarun Bharat

गुरुवार पेठेत घरफोडी; 25 तोळे लंपास

दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे बंद घरात चोरी

प्रतिनिधी/ सातारा

शहरातील गुरूवार पेठेतील बंद घर फोडून चोरटय़ांनी 25 तोळे सोने चोरून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. सोमवारी ही चोरीचा घटना उघडकीस आल्याने शहरासह जिह्यात चांगली खळबळ माजली. जेधे कुटुंब परगावी गेल्याचा फायदा चोरटय़ांनी घेतला. या चोरीचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हे सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांच्या हाती आले असून पुढील तपासासाठी पथके रवाना केली आहे, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.

 कमानी हौदच्या खालच्या बाजूस असणाऱया गुरूवार पेठेत शिवाजीराव जेधे राहत आहेत. चार दिवसापुर्वी जेधे हे आपल्या कुटुंबासोबत पुण्याला गेले होते. यावेळी घर बंद होते. घर बंद असल्याचे चोरटय़ांच्या लक्षात येताच रविवारी मध्यरात्री दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून चोरटय़ांनी आता प्रवेश केला. यावेळी घरातील साहित्य अस्थाव्यस्थ केले. यानंतर कपाट उघडून त्यात ठेवलेले आठ बांगडय़ा, दोन मंगळसुत्र, दोन नेकलेस, चांदीची भांडी, तीन चेन असे 25 तोळे सोने घेऊन चोरटे पसार झाले. सोमवारी सकाळी जेधे यांच्या घरी चोरी झाल्याचे परिसरातील नागरिकांना कळले. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात यांची माहिती दिली. पोलीसही तत्काळ घटनास्थळी पोहचले.

 या चोरीची माहिती शिवाजीराव जेधे यांनाही देण्यात आली. तोच पोलिसांनी पंचनामा सुरू केला. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने ही चोरी कॅमेऱयात कैद झाली आहे. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी चार पथके रवाना केली आहेत. लवकरच हा गुन्हा उघडकीस येऊन चोरटे जेरबंद होतील असे आश्वासन पो. नि. निंबाळकर यांनी दिलेले आहेत.  

आवाहन करूनही दुर्लक्ष

दिवाळी सणानंतर घरात दागिने, पैसे ठेऊन परगावी, पर्यटनासाठी अनेक कुटुंब जातात. हे चोरटय़ांना माहिती असल्याने हे सोने, पैसे बँकेत ठेवा किंवा अडगळीच्या ठिकाणी ठेवा असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे चोरीचा घटना वाढत आहेत.

Related Stories

खिंडवाडीतील खासगी सावकारास ठोकल्या बेडय़ा

Patil_p

सातारा : युवकाने केली आत्महत्या

Archana Banage

सातारा शहराला पावसाने झोडपले

Patil_p

एसटी कामगार संघटनेने केले आक्रोश आंदोलन

Archana Banage

अखेर उध्दवजींना उद्योगांच महत्त्व समजू लागलं-देवेंद्र फडणवीस

Archana Banage

खासदार उदयनराजे यांच्या हस्ते ग्रेड सेपरेटरचे हस्तांतरण

Archana Banage