हुक्केरी – हुक्केरी तालुक्यातील हेब्बाळमध्ये घरफोडीच्या घटनेचा २४ तासांत पर्दाफाश करण्यात आला. चोरी करणाऱ्या आरोपींना ५.३ लाख रुपयांच्या दागिन्यांसह अटक करण्यात आले आहे. हेब्बाळचे रहिवासी दीपक यांच्या घरी चोरी झाली होती. गोकाक डीएसपी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकामार्फत याप्रकरणी कारवाई करून आरोपीला पकडण्यात यश आले असून सुमारे 85 ग्रॅम सोन्याचे दागिने व 4500 रुपये रोख जप्त करण्यात आली आहे.
Previous Articleगुजरातमध्ये भाजपची रेकॉर्डब्रेक विजयाकडे वाटचाल
Next Article मुधोळ- निपाणी महामार्गावर अपघात; दोन जण ठार