Tarun Bharat

वीरभद्रनगर येथे अडीच लाखाची घरफोडी

बंद घराचा कडीकोयंडा तोडून दागिने, रोकड लांबविली

प्रतिनिधी/ बेळगाव

वीरभद्रनगर, तिसऱया क्रॉसवरील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे अडीच लाखाचा ऐवज लांबविला आहे. शनिवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

सुभानी सनदी यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे. बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला आहे. तिजोरीतील 35 ग्रॅम सोने, अर्धा किलो चांदी व 21 हजार 500 रुपये रोख रक्कम असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज पळविला आहे. घटनेची माहिती समजताच मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

शुक्रवारी रात्री आपल्या घराला कुलूप लावून सुभानी व त्यांचे कुटुंबीय कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त वीरभद्रनगर, सातव्या क्रॉसजवळ राहणाऱया आपल्या भावाच्या घरी गेले होते. कार्यक्रम आटोपून शनिवारी सकाळी ते घरी परतले. त्यावेळी दरवाजा उघडा होता. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला. मार्केट पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

‘तरुण भारत’चा दिवाळी अंक सर्वसमावेशक

Patil_p

बेळगाव जिल्हय़ात पाच उपआरटीओ कार्यालये

Patil_p

“माझा गणराया” घरगुती गणेश मूर्ती सजावट स्पर्धा

Rohit Salunke

भंडाऱयाच्या उधळणीत पिरनवाडी, खादरवाडीत मिरवणूक

Amit Kulkarni

एकनाथ रानडे यांची जयंती विवेकानंद केंद्रातर्फे साजरी

Patil_p

चुडाप्पा हलगेकर कुस्ती समितीतर्फे फेब्रुवारीत कुस्ती मैदान

Patil_p
error: Content is protected !!