Tarun Bharat

जम्मू-काश्मीरमध्ये बस दुर्घटना, 12 ठार

खोल दरीत कोसळली; बस 5 जखमींना जम्मूत हलविले

वृत्तसंस्था/ पुंछ

जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये बुधवारी झालेल्या बस दुर्घटनेत 12 जणांना जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेत 30 प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैन्यासोबत स्थानिक लोकांनी बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढत रुग्णालयात हलविले आहे. जखमींपैकी 5 जणांना जिल्हा रुग्णालयातून जम्मूच्या रुग्णालयात एअरलिफ्ट करण्यात आले आहे.

ही दुर्घटना सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मिनीबस मंडी येथून सवजियांच्या दिशेने प्रवास करत होती. चालकाने नियंत्रण गमावल्याने ही बस खोलदरीत कोसळली. या दुर्घटनेत 9 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर 3 जणांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सर्व मृतांच्या कुटुंबांना 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर उत्तम उपचार करण्याचे आदेश अधिकाऱयांना दिले आहेत. पीएमएनआरएफने देखील मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. रस्ते दुर्घटनेत लोकांचा मृत्यू अत्यंत दुःखद आहे. पीडित कुटुंबासोबत माझ्या संवेदना असून जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करत असल्याचे मुर्मू यांनी म्हटले आहे.

Related Stories

‘गुगल’ची भारतात 75 हजार कोटींची गुंतवणूक

Patil_p

देशातील 32 शेतकरी संघटनांची आज बैठक

datta jadhav

देशभरात बाधितांची संख्या 3577

Patil_p

यापुढे केवळ रुग्णाचे घर सीलडाऊन

Patil_p

बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Patil_p

प्रवासी विमान वाहतुकीवर ३० सप्टेंबरपर्यंत निर्बंध

Patil_p