सुदैवाने कुणीही जखमी नाही : मात्र दोन्ही एसटींचे मोठे नुकसान
ओटवणे | प्रतिनिधी
दोन एसटी बसची एका बाजूने समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कुणीही जखमी झाले नाहीत. मात्र या अपघातात दोन्ही एसटी गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याची कोलगाव तिठा येथे बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. कणकवली डेपोची एसटी बस सावंतवाडीला येत असताना तर कुडाळ डेपोची बस सावंतवाडीतून कुडाळला जात असताना कोलगाव तिठा येथे हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात प्रवाशांसह चालक वाहक कुणीही जखमी झाले नाहीत मात्र या अपघातात दोन्ही एसटी गाड्यांचे मोठे नुकसान झाले.मोटरसायकलस्वाराला बाजू देत असताना हा अपघात घडल्याचे बस चालकाने सांगितले. या अपघाताची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.