Tarun Bharat

सोलापूर- गाणगापूर बसला अपघात; ३५ प्रवासी जखमी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

अक्कलकोट-मैंदर्गी मार्गावर (akkalkot-maindargi) गाणगापूर (ganagapur) येथील एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण ३० ते ३५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातांनंतर जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अक्कलकोट येथील रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने खासगी डॉक्टरांनादेखील पाचरण करण्यात आले. सकाळी १०.३०च्या सुमारास हा अपघात झाला असून च्याचे नेमके कारण अद्याप समोर नाही. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची दखल घेत जखमींना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे.

या अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दखल घेतली आहे. अपघातातून जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. तसेच जखमी झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सोलापूर-गाणगापूर बस अपघातात ३० ते ३५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अक्कलकोट – मैंदर्गी रस्त्यावरील शेतालगत बस पलटी झाली आहे. हा अपघात सकाळी १०.३० च्या सुमारास झाला. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Related Stories

पुण्यातही एसटीचा ब्रेक फेल; भर चौकात सात गाड्या चिरडल्या

Archana Banage

सोलापूर : विटंबना निषेध व आमदार राऊत धमकी प्रकरणी बार्शी कडकडीत बंद

Archana Banage

दोन वेळा आमदार,खासदार- माजी मंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे भांडवलदार प्रवृती; समरजीतसिंह घाटगे

Archana Banage

यांच्या वाट्याला रोजच एप्रिल फुल..!

Abhijeet Khandekar

कोरोनामुळे फुटबॉलपटू नॉर्मन हंटर यांचे निधन

prashant_c

राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी 36 कर्मचारी कोरोनाबाधित

Tousif Mujawar
error: Content is protected !!