Tarun Bharat

ग्रामीण भागातील बसचा प्रवास होणार स्मार्ट

Advertisements

2 ऑक्टोबरपासून सर्व बसमध्ये ट्रव्हल कार्डचे वितरण : सुट्टय़ा पैशांची कटकट संपणार, स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवास

प्रतिनिधी /बेळगाव

सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी परिवहनने प्रवासकार्ड कॅशलेस योजनेला सुरुवात केली आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागातील बसेसमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सुट्टय़ा पैशांची कटकट कमी होणार आहे.

यापूर्वी केवळ शहरातील 20 बसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही कॅशलेस योजना राबविण्यात आली होती. आता ग्रामीण आणि शहरातील सर्वच बसमध्ये ट्रव्हल कार्ड योजना सुरू केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना खिशात पैसे ठेवण्याची गरज भासणार नाही. या ट्रव्हल कार्डच्या माध्यमातून विविध ठिकाणी प्रवास करता येणार आहे. मात्र या कार्डमध्ये रिचार्ज करून पैसे ठेवणे आवश्यक आहे. सर्वच बसमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार असल्याने दैनंदिन प्रवास करणाऱया प्रवाशांना या स्मार्टकार्डच्या माध्यमातून प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे.

ग्रामीण भागातील विविध मार्गांवर दररोज 700 हून अधिक बस धावतात. या सर्व बसमध्ये ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. हे कार्ड सोबत असल्यास खिशात सुट्टे पैसे आहेत की नाही, याची चिंता करण्याची गरज भासणार नाही. दोन महिन्यांपासून वडगाव, येळ्ळूर, अनगोळ, धामणे, सुळगे, देसूर या बसमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. मात्र आता सर्वच बसमध्ये प्रवासकार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा प्रवासदेखील स्मार्ट होणार आहे.  

दैनंदिन प्रवास करणाऱया कामगार वर्गाची संख्या अधिक आहे. या कर्मचाऱयांना एक टॅव्हल कार्ड उपयुक्त ठरणार आहे. शिवाय वाहकावरील तिकीट काढण्याचा ताणदेखील कमी होणार आहे. 2 ऑक्टोबरपासून सर्व बसमध्ये हे कार्ड मोफत वितरित केले जाणार आहे. मात्र प्रवासासाठी प्रवाशांना कार्डमध्ये रिचार्ज करणे आवश्यक आहे. या कार्डमध्ये 100 रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंत एकावेळेला रिचार्ज करता येते. शिवाय कुटुंबातील किंवा नातेवाईकांपैकी कोणीही प्रवास करू शकते.

रिचार्ज करून प्रवास करावा लागणार

शहरात काही मोजक्मया बसमध्ये ट्रव्हल कार्डे वितरित करण्यात आली होती. या माध्यमातून प्रवास सुरू होता. आता शहर आणि ग्रामीण भागातील सर्व बसमध्ये हे ट्रव्हल कार्ड दिले जाणार आहेत. यामध्ये रिचार्ज करून प्रवासी प्रवास करू शकतात.

-के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी)

Related Stories

हुतात्मादिनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहा

Amit Kulkarni

महात्मा फुले रोडवर गळतीमुळे पिण्याचे पाणी वाया

Amit Kulkarni

गोकुळ युवक मंडळाची स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

हेस्कॉम कार्यालयात साडेअकरा लाखाची चोरी

Omkar B

ऑनलाईन क्लाससंबंधीही सावधगिरी बाळगा

Omkar B

लॉकडाऊनच्या काळातही रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू

Patil_p
error: Content is protected !!