Tarun Bharat

शैक्षणिक सहलींसाठी बस धावणार सुसाट

भाडय़ात काहीशी वाढ : परिवहनकडून बसेस सज्ज : शाळांच्या सहलींचा हंगाम सुरू : जादा महसुलाची अपेक्षा

प्रतिनिधी /बेळगाव

दोन वर्षांया कोरोना संकटानंतर यंदा शैक्षणिक सहलींसाठी बस सुसाट धावणार आहेत. शैक्षणिक सहली आणि पर्यटना हंगाम सुरू झाल्याने परिवहनाया बसना मागणी वाढली आहे. शिवाय 300 कि. मी. ााा प्रवासदेखील निशात झाला आहे. त्यामुळे परिवहनाया बस शैक्षणिक सहलींसाठी सज्ज झाल्या आहेत.

नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात शैक्षणिक सहली आणि पर्यटनस्थळांना भेटी देणाऱया पर्यटकीं संख्या अधिक असते. यासाठी परिवहनने बस सेवो नियोजन केले आहे. त्यामुळे यंदा परिवहनी बस शैक्षणिक सहलींसाठी धावणार आहे. गत दोन वर्षात कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे शैक्षणिक सहलीदेखील थांबल्या होत्या. मात्र, यंदा पूर्ववतपणे शैक्षणिक सहलींना प्रारंभ झाला आहे. शैक्षणिक सहलींसाठी शाळा व्यवस्थापनाकडून बस बुकींग केल्या जात आहेत. मात्र, यंदा बस भाडे दरात वाढ झाली आहे. प्रति कि. मी. 2 ापये अधिक मोजावे लागणार आहेत. वाढलेल्या इंधन दरवाढीमुळे परिवहनने हा निर्णय घेतला आहे.

शिक्षण खात्याचा आदेश

शैक्षणिक सहलींसाठी शाळा व्यवस्थापनी धडपड सुरू झाली आहे. दरम्यान, शिक्षण खात्यानेदेखील सहलींसाठी परिवहनाया बसेस बुकींग कराव्यात, असा आदेश दिला आहे. त्यामुळे यंदा शैक्षणिक सहलींसाठी परिवहनाया बसेस अधिक दिसणार आहेत. मात्र, शाळा व्यवस्थापनाला दहा दिवस अगोदर बस बुकींग कराव्या लागणार आहेत. परराज्यात सहलीसाठी जाताना परवानगी आवश्यक आहे. यासाठी सहलो नियोजन करणाऱया शाळांनी दहा दिवस अगोदर परिवहनला माहिती देणे आवश्यक आहे.

मागील दोन वर्षात कोरोनामुळे नोव्हेंबर-डिसेंबरा सिझन वाया गेला होता. त्यामुळे परिवहनला कोटय़वधां तोटा सहन करावा लागला होता. मात्र, आता बससेवा आणि शाळादेखील सुरळीत सुरू झाल्याने यंदा शैक्षणिक सहलींसाठी बस विविध मार्गांवर धावणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक सहलांया माध्यमातून परिवहनला अधिक महसूल प्राप्त होण्यी शक्यता आहे.

दरवर्षी प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमातील एक भाग म्हणून शैक्षणिक सहलों नियोजन केले जाते. या सहलींसाठी परिवहनाया बसेस बुक केल्या जातात. त्यामुळे शैक्षणिक सहलींतून परिवहनला समाधानकारक महसूल प्राप्त होतो. विशेषतः बेंगळूर, म्हैसूर, विजापूर, श्रवणबेळगोळ, महाबळेश्वर, गड-किल्ले आणि गोव्याला सहलों नियोजन केले जाते. दरम्यान, सुरक्षितता आणि इतर बाबां वार करून परिवहनाया बसला प्राधान्य दिले जाते.

शैक्षणिक सहलींसाठी बस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संबंधित शाळांया व्यवस्थापन कमिटीने 10 दिवस अगोदर बुकींग करणे आवश्यक आहे. स्थानिक आणि लांब पल्ल्यांया सहलींसाठीदेखील बस उपलब्ध होणार आहेत.

 -के. के. लमाणी, विभागीय सांर अधिकारी

Related Stories

22 पासून महाराष्ट्रासाठी कर्नाटकातून बससेवा

Patil_p

अधिवेशनावेळी सर्वांची योग्यप्रकारे सोय करा!

Patil_p

टेम्पो-ट्रक्टर अपघातात 1 ठार

Patil_p

रणवीर, गगन, आदित्य, अर्णा विजेते

Amit Kulkarni

तालुक्यात शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने

Amit Kulkarni

देवाचीहट्टी शाळेत लोककल्पतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

Amit Kulkarni