नुतनीकरणाची डोकेदुखी झाली कमी : परवाने वितरणास प्रारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
शहरामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी महापालिकेकडून व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. यापूर्वी केवळ एक वर्षाच्या कालावधीकरिता व्यवसाय परवाना दिला जात होता. मात्र आता व्यावसायिकांच्या सोयीनुसार दोन, तीन आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी एकदाच व्यवसाय परवाना देण्यात येत आहे. महापालिकेने अलीकडेच पाच वर्षांच्या कालावधीसाठी व्यवसाय परवाना देण्यास प्रारंभ केला आहे.
व्यवसाय करण्यासाठी परवान्याची आवश्यकता आहे. मात्र व्यवसाय परवान्यासाठी लागणाऱया कागदपत्रांची पूर्तता करता येत नसल्याने व्यवसाय परवाना घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. व्यवसाय परवान्यासाठी महापालिका कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागतात. त्यामुळे व्यवसाय परवाना घेण्याची सुविधा सोयीस्कर करण्यात आली आहे. घरबसल्या ऑनलाईनद्वारा अर्ज करून व्यवसाय परवाना घेता येवू शकतो. त्याचप्रमाणे आता दोन, तीन आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी एकदाच व्यवसाय परवाना देण्याची योजना राबविण्यात येत आहे. यापूर्वी एक वर्षाच्या कालावधीकरिता व्यवसाय परवाना दिला जात असे.
मात्र आता दोन, तीन आणि पाच वर्षांच्या अवधीकरिता व्यवसाय परवाना देण्यात येत असल्याने व्यवसाय परवाना नुतनीकरण करण्याची डोकेदुखी कमी झाली आहे. दोन, तीन अथवा पाच वर्षांच्या अवधीकरिता व्यवसाय परवाना घेतल्यास तितक्मया वर्षाचा शुल्क महापालिकेला भरावा लागतो. तसेच प्रत्येक वषी व्यवसाय परवाना नुतनीकरण करण्यासाठी कागदपत्रे जमावजमव करून मनपा कार्यालयाच्या पायऱया झिजविण्याचे वाचणार आहे. महापालिकेने नव्या धोरणानुसार नागरिकांच्या मागणीनुसार व्यवसाय परवाने देण्यास प्रारंभ केला आहे. व्यावसायिकांनीही पाच वर्षांच्या कराराने व्यवसाय परवाना घेण्यास पसंती दर्शविली असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी संजय डूमगोळ यांनी दिली.