सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील राधिका रोडवरील वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या सातारा मोटर्सचे मालक अमित आबासाहेब भोसले यांची वाढे फाट्याजवळ रात्री १२ च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करुन हत्या केली. येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून बेसिनवर हात धुत असताना लाईट बंद करून अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. भोसले जमीनीवर पडल्यानंतर त्यांचा चेहरा दगडांनी ठेचून हल्लेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच तालुका आणि शाहुपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळावर जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह तालुका आणि शाहुपुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. अमित भोसले यांच्या मारेकऱ्यांचा सदरच्या हॉटेल मालक, अन्य मित्रांकडून माहिती घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अधिक वाचा : कसबा पोटनिवडणुकीचा निर्णय दिल्लीतूनच