Businessman, social activist Sandeep Parkar passed away
रेल्वेतुन प्रवास करताना पडून झाला मृत्यू
चिंदर येथील प्रथतियश व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते आणि वैभवशाली पतसंस्थेचे संचालक संदिप हरी पारकर वय 58रा.चिंदर भटवाडी यांचे गुरुवारी सकाळी रेल्वेतन पडून दुःखद निधन झाले.संदिप पारकर हे चिंदर मधील भगवती मंगल कार्यालय आणि पारकर टी हाऊसचे मालक होते. चिंदर मधील प्रत्येक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात त्याचा हिरहिरिने सहभाग असायचा. ते भगवती उत्साही मंडळाचे खजिनदार आणि आधारस्तंभ होते.चिंदर येथील रामेश्वर देवस्थान समितीचे ते सचिव होते. तर आचरा येथील वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्थेचे ते संचालक होते.रवळनाथ मंदिराचा जिर्णोद्धार त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला होता. मनमिळाऊ आणि शांत स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा होता. कोणत्याही प्रसंगी मदतीसाठी ते सदैव तत्पर असायचे. त्यांच्या दुःखद निधनाने चिंदर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली मुलगा भाऊ बहिणीअसा परीवार आहे.
आचरा प्रतिनिधी