Tarun Bharat

विमानसेवेवरून उद्योजक-व्यापारी नाराज

केंद्रीय मंत्र्यांची घेणार भेट  : 10 रोजीपासून बेळगाव -दिल्ली विमानसेवाही होणार बंद

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव-दिल्ली विमानफेरी डिसेंबर 10 पासून बंद करण्याचा निर्णय स्पाईस जेटने घेतला आहे. यामुळे बेळगावचा देशाच्या राजधानीशी संपर्क तुटणार आहे. आधी हैदराबाद, बेंगळूर, मुंबई आता दिल्ली शहरांच्या विमानसेवा बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रवासी संख्या उत्तम असतानाही विमानसेवा बंद केली जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी यांना सर्वाधिक फटका बसला आहे.

दिल्ली विमानफेरीमुळे बेळगाव विमानतळावर 180 आसन क्षमता असणारे बोईंग विमान उतरत होते. दररोज 300 च्या आसपास प्रवासी बेळगाव-दिल्ली-बेळगाव या मार्गावर प्रवास करत होते. अवघ्या अडीच तासात देशाच्या राजधानीला पोहोचता येत असल्याने उत्तम प्रतिसाद मिळाला. परंतु तांत्रिक कारण देत बेळगावची विमानसेवा इतरत्र पळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वीही असे प्रकार घडले होते.

त्यावेळी सर्वच स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर विमानफेऱ्या पूर्ववत झाल्या. विमानफेऱ्या बंद झाल्याने उद्योजक, व्यापारी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ज्योतिरादित्य शिंदे यांची घेणार भेट

बेळगावची विमानसेवा सातत्याने बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रवासी संख्या उत्तम असतानाही विमानसेवा बंद केली जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यामुळे बेळगावचे नुकसान होणार असून विमानसेवा पूर्ववत होण्यासाठी केंद्रीय नागरी उ•ाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली जाणार आहे. भाजप नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे येत्या दोन दिवसात शिंदे यांची भेट घेतली जाणार आहे.

व्यावसायिकदृष्ट्या विमानफेरी महत्त्वाची

बेळगावहून देशाच्या राजधानीला बेळगाव-दिल्ली विमानफेरीने जोडण्यात आले होते. व्यावसायिकदृष्ट्या पाहता ही विमानफेरी अतिशय महत्त्वाची होती. केवळ बेळगावच नाही तर सांगली, कोल्हापूर, कोकण येथूनही प्रवासी दिल्लीचा विमानप्रवास करीत होते. परंतु प्रवासी संख्या उत्तम असतानाही विमानफेरी बंद करणे चुकीचे आहे. त्यामुळे ही विमानफेरी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

–  किरण जाधव (भाजप नेते)

दररोज 60 ते 70 प्रवाशांचा प्रवास

बेळगावमध्ये अनेक लहान-मोठे उद्योजक आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींची पुणे, नाशिक, मुंबई, बेंगळूर येथे नेहमी ये-जा असते. बेळगाव-पुणे विमान सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत होता. दररोज 60 ते 70 प्रवासी प्रवास करत असतानाही ही विमानफेरी बंद करण्यात आली. यामुळे उद्योजक व व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून ही विमानफेरी पुन्हा सुरू करावी.

– सुधीर कार्लेकर (उद्योजक)

विमानसेवा पूर्ववत सुरू करा

देशातील एक जुने विमानतळ म्हणून बेळगाव विमानतळाची ओळख आहे. बेळगावमधून देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवेने जोडण्यात आले होते. परंतु बेळगावच्या सेवा बंद करून त्या हुबळीला घेऊन जाण्याचा प्रकार घडत आहे. यामुळे प्रत्येक विमान प्रवाशाला फटका बसत आहे. यामुळे बेळगावचे महत्त्वही कमी करण्याचा प्रयत्न होत असून हे थांबवून विमानसेवा पूर्ववत कराव्यात.

– दीपक अवर्सेकर (नागरिक)

गत 3 वर्षांत बंद झालेल्या विमानफेऱ्या

विमान कंपनी              रद्द झालेली सेवा

 • स्पाईस जेट  बेळगाव -मुंबई
 • बेळगाव-हैदराबाद
 • बेळगाव -दिल्ली
 • बेळगाव-बेंगळूर
 • इंडिगो        बेळगाव-चेन्नई
 • अलायन्स एअर             बेळगाव-पुणे
 • बेळगाव-बेंगळूर

स्टार एअर

 • बेळगाव-बेंगळूर
 • बेळगाव-नाशिक

ट्रू जेट

 • बेळगाव-म्हैसूर
 • बेळगाव-तिरुपती
 • बेळगाव-कडप्पा
 • बेळगाव-हैदराबाद

Related Stories

हलगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni

बससेवा ठप्प झाल्याने चंदगडवासियांचे हाल

Amit Kulkarni

शनिवारी जिल्हय़ात 57 कोरोनाबाधित

Patil_p

गुरुवारी 562 जण झाले कोरोनामुक्त

Patil_p

रासायनिक खतांचा शेतीत वाढता वापर

Amit Kulkarni

शहरात मोहरम गांभीर्याने

Amit Kulkarni