Tarun Bharat

बी व्ही मालवणकर यांना कलाध्यापक संघाचा आदर्श कलाशिक्षक पुरस्कार

Advertisements

सावंतवाडी/प्रतिनिधी- 

राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीचे कलाशिक्षक बी.व्ही. मालवणकर यांना महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे, जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्यावतीने ‘विद्यार्थी प्रिय आदर्श कलाशिक्षक’म्हणून सन्मान पत्र देत गौरविण्यात आले. नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभ कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थ्यांसह मालवणकर कुटुंबीयांनी त्यांच्यासोबतच्या आठवणीना उजाळा देत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशालेची विद्यार्थिनी अस्मी मांजरेकर या विद्यार्थिनीने केलेल्या भाषणाच मान्यवरांनी विशेष कौतुक केल. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी त्यांना भेटवस्तू देत निरोप दिला. यावेळी बोलत असताना श्री. मालवणकर भावूक झाले. याप्रसंगी मुख्याध्यापक जगदीश धोंड, एस.पी. नाईक, सुमेधा नाईक, अरविंद साळगावकर, जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष रुपेश नेवगी, उपाध्यक्ष प्रकाश महाभोज, राज्य महामंडळाचे विभागीय उपाध्यक्ष बी जी सामंत, जेष्ठ कलाशिक्षक व संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते शंकर कोंडये, सौ. मालवणकर, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण मांजरेकर, चित्रकार अक्षय सावंत, विनायक गांवस, श्री. पाटील, श्री. मुठे, सौ. म्हापसेकर, सौ. म्हापणकर, सौ. चौकेकर, सौ. तोंडवळकर, श्री. कशाळीकर, श्री. शृंगारे, सौ. सावळ, सौ. खोचरेकर आदिसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका सौ. खोचरेकर यांनी तर आभार नाईक यांनी मानले.

Related Stories

रत्नागिरी : लॉकडाऊन असतानाही दापोलीत पर्यटक

Abhijeet Shinde

भ्रष्टाचार उघड झाला, सभापती राजीनामा कधी देणार?

NIKHIL_N

पाणीटंचाई कामांसाठी संचारबंदी नियम नाही!

NIKHIL_N

भारतीय टेनिसबॉल क्रिकेट संघात ऋतिक सावंत याची निवड

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : वेळणेश्वर येथे गावठी दारू अडड्यावर पोलीसांची कारवाई

Abhijeet Shinde

कोकण रेल्वेतून चाकरमान्यांचा प्रवास लोंबकळतच

Patil_p
error: Content is protected !!