Tarun Bharat

बीव्हीजी कंपनी घेणार स्वच्छता कामाची माहिती

अधिकारी शहरातील कचरा व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी आज येणार : स्वच्छतेसाठी 22 कोटींची तरतूद

प्रतिनिधी /बेळगाव

शहराच्या स्वच्छतेचे कंत्राट देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बेंगळूर येथील नगर प्रशासनाच्या अधिकाऱयांनी बुधवारी कचरा विल्हेवारीची पाहणी केली. तसेच शुक्रवारी बीव्हीजी कंपनीचे अधिकारी शहरातील कचरा व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी येणार असल्याचे समजते. 

शहरातील कचऱयाची उचल करण्यासह वाहतूक करण्याची जबाबदारी खासगी कंत्राटदारांवर सोपविण्यात आली होती. यापूर्वी 20 पॅकेजद्वारा निविदा काढून कामे देण्यात येत होती. मात्र महापालिकेने संपूर्ण शहरातील कचऱयाची उचल करण्यासाठी केवळ पाच पॅकेज करून निविदा काढल्या आहेत. 22 कोटींची तरतूद स्वच्छतेसाठी करण्यात आली आहे. पहिल्यावेळी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत एकाही कंत्राटदाराने सहभाग घेतला नाही. त्यामुळे महापालिकेने दुसऱयांदा निविदा काढल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत पुणे येथील बीव्हीजी कंपनीने निविदा भरल्या आहेत. सदर कंत्राटदार निविदा प्रक्रियेत पात्र झाले असून 4.6 टक्के वाढीव रक्कम देऊन निविदा मंजूर करण्याचा निर्णय नगर प्रशासनाने घेतला आहे.

त्यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी बेंगळूरहून नगर प्रशासन खात्याच्या दोन अधिकाऱयांनी बुधवारी बेळगाव महापालिकेला भेट दिली. यावेळी विविध भागात फिरून मनपा अधिकाऱयांकडून कचरा व्यवस्थापनाची माहिती घेतली. तसेच पुढील प्रक्रिया सुरू आहे.

निविदा प्रक्रियेत पात्र…

शुक्रवारी बीव्हीजी कंपनीचे प्रतिनिधी बेळगाव भेटीला येणार असून कचरा व्यवस्थापनाची तसेच कामकाजाची माहिती घेणार असल्याचे समजते. स्वच्छता कामाच्या निविदा प्रक्रियेत बीव्हीजी कंपनी पात्र ठरल्याने कामाची पाहणी करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Stories

नागपंचमी सणाला उत्साहात प्रारंभ

Patil_p

गोपुळ ऑर्गेनिक आऊटलेटचे उद्घाटन

Amit Kulkarni

डिझेल टँकरमधून बेकायदा दारू वाहतूक

Amit Kulkarni

केंद्र सरकारच्या योजना राबविण्यात बेळगाव जिल्हय़ाचा दहावा क्रमांक

Amit Kulkarni

तलावाचे अस्तित्व राखण्यासाठी प्रशासनाने लावला फलक

Omkar B

कापड दुकानामध्ये उडतोय सोशल डिस्टनंचा फज्जा

Patil_p