Tarun Bharat

By polls Results : उत्तर प्रदेशात भाजपचा विजय; तर दिल्लीमध्ये ‘आप’ विजयी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

देशामधील सहा राज्यांतील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. आज या पोटनिवडणूकीचे निकाल जाहीर होत आहेत. उत्तप्रदेशमध्ये ‘सपा’च्या बालेकिल्ल्याला भाजापने सुरुंगलावला आहे. तर त्रिपुरातही भाजप उमेदवार विजयी झाला आहे. समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रामपूर मतदारसंघात सपाचे आमदार असीम राजा यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपाचे उमेदवार घनश्याम सिंह लोधी यांनी असीम राजा यांचा पराभव केला आहे.

दुसरीकडे दिल्लीतील भाजप आणि आम आदमी यांच्यात झाला होता. राजेंद्र नगर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आम आदमीचे उमेदवार दुर्गेश पाठक विजयी झाले आहेत. पाठक यांनी ११ हजार ५५५ मतांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला. त्रिपुरा विधानसभा पोटनिवडणुकीत त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा (Manik Saha) टाउन बारडोवली मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

पंजाबमधील संगरुर लोकसभा मतदानसंघात शिरोमणी अकाली दलच्या सिमरनजीत सिंह मान यांनी विजय मिळवला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा हा मतदारसंघ होता. सिमरनजीत सिंह मान यांनी आपचे उमेदवार गुरमैल सिंह यांचा ७ हजार मतांनी पराभव केला आहे.

माणिक सहा विजय
माणिक सहा यांना काँग्रेसच्या आशिष कुमार साहा यांचे आव्हान होते. मात्र निवडणुकीत माणिक साहा यांनी आशिष साहा यांचा ६,१०४ मतांनी पराभव करत विजय मिळवला. मुख्यमंत्री पदावर टिकून राहण्यासाठी माणिक सहा यांना विजय मिळवणे गरजेचे होते. तर उत्तर प्रदेशमध्ये आझमगड आणि रामपूर लोकसभा जागांवरही पोटनिवडणूक घेण्यात आली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी आमदारकी मिळाल्यानंतर खासदारपदाचा राजीनामा दिला होता.

Related Stories

यश-अपयशाची भीती न बाळगता परीक्षा द्या!

Patil_p

राज्यपालांची भूमिका ही कायदा आणि घटनेचा भंग करणारी : संजय राऊत

Archana Banage

मिझोराम पोलिसांनी थेट आसामच्या मुख्यमंत्र्यांवर दाखल केला गुन्हा

Archana Banage

तालिबानकडून सरकार स्थापनेची घोषणा

datta jadhav

दारूविक्रीसाठी ‘होम डिलिव्हरी’चा विचार करा

Patil_p

नागरिकत्व सुधारणा कायद्याचे भाजपचे आश्वासन

Patil_p