Tarun Bharat

टुरिस्ट टॅक्सी संघटनेतर्फे डॉ. दादा वैद्य जयंती

प्रतिनिधी/ फोंडा

फोंडा तालुक्यातील आद्य समाजसुधारक व शिक्षण प्रवर्तक डॉ. दादा वैद्य यांची 163वी जयंती दादा वैद्य चौक फोंडा येथील टुरिस्ट टॅक्सी संघटनेतर्फे साजरी करण्यात आली. दादा वैद्य चौकातील पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून संघटनेतर्फे आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष रत्नदीप नाईक, पदाधिकारी रत्नाकर नाईक व संघटनेचे अन्य सदस्य उपस्थित होते. मुक्तीपूर्व काळात पोर्तुगीज आमदानीत फोंडा तालुक्यामध्ये डॉ. दादा वैद्यांनी शिक्षण प्रसाराचे महान कार्य केले. समाजामध्ये जागृती करून गोमंतकीयांमध्ये राष्ट्राभिमान जागविला. त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी राहील, असे रत्नदीप नाईक म्हणाले. फोंडा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला त्यांचा पुतळा ही फोंडय़ाची कायम ओळख बनून राहिली आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. टुरिस्ट टॅक्सी संघटनेतर्फे गेल्या काही वर्षांपासून डॉ. दादा वैद्य यांची जयंती साजरी करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते.

Related Stories

गौण खनिज आयातीसाठी यापुढे परवाना सक्तीचा

Patil_p

स्वामी विवेकानंदजी करोडो युवकाचे प्रेरणास्थान

Amit Kulkarni

पूर्ण बहुमत द्या, गोव्याचा कायापालट करू

Amit Kulkarni

‘अटल सेतू’ जोडपुलाचा रस्ता खचला

Amit Kulkarni

कोरोना बळी व आपत्तग्रस्तांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार

Amit Kulkarni

सहकार क्षेत्रातील कर्जबुडव्यांसाठी आता कडक कायदे

Amit Kulkarni
error: Content is protected !!