Tarun Bharat

माशेल येथून जलमार्गाने तरंगदेवता मयेत दाखल

डिचोली/प्रतिनिधी

  मये गावातील प्रसिध्द रेडय़ाची जत्रा यावषी या देवस्थानच्या मानकऱयांमध्ये निर्माण झालेल्या मानाच्या वादामुळे रद्द झाल्याने मयेतील भाविक भक्तजनांचा विरस झाला. मयेत जत्रोत्सव होणार नसल्याने गावात शांतता पसरली आहे. मात्र पूर्वपरंपरेनुसार माशेल येथील श्री देवकी, कृष्ण व पिसो रवळनाथ देवाची तरंग देवता होडीतून जलमार्गाने मयेत काल (शनि. दि. 23) संध्याकाळी दाखल झाली.

   मयेतील प्रसिद्ध माल्यांच्या जत्रोत्सवावेळी कुंभारवाडा मये येथील सातेरी मंदिरातून माले बाहेर काढताना या देवस्थानच्या मानकऱयांमध्ये मानाचा मुद्यावरून वाद निर्माण झाला होता. सदर वादावर अखेरपर्यंत तोडगाच निघू न शकल्याने माले देवी केळबाई मंदिरात आणि नंतर चव्हाटा येथे पोहोचलेच नाही. त्यामुळे माल्यांची जत्रा संपन्न झालीच नव्हती. पहाटे देवी केळबाईची पेठ बांधून देवीच्या केळबाईवाडा येथील मंदिरात नेण्यात आल्याने हि व्ह?डली म्हणजेच रेडय़ाची जत्रेवर अनिश्चिततेचे सावट पसरले होते.

  गावकरवाडा मये येथील श्री महामाया देवीच्या मंदिराशेजारी असलेल्या एका विशेष जागेवर पेठ व माले ठेवले जाते. सदर माले, पेठ व देवीचा कळस वाजत गाजत केळबाईवाडा येथे जातात. तेथे मयेतील देव रवळनाथ भूतनाथची तरंगे येतात. तसेच माशेल येथील देवकी, कृष्ण व पिसो रवळनाथ देवांची तरंगे येतात व मोठय़ा उत्साहात जत्रा संपन्न होते. परंतु यावषी महामाया देवीच्या मंदिराशेजारी देवीची पेठ व मालेच नसल्याने व्ह?डली जत्रा होण्याची शक्मयताच नव्हती. त्याप्रमाणे या जत्रोत्सवाची कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती.

  मयेत जरी हि जत्रा होत नसली तरी पूर्वपरंपरेनुसार माशेल गावची देवकी, कृष्ण व पिसो रवळनाथ या देवतांची तरंगे प्रथेनुसार होडीतून जलमार्गाने पाटो मये येथे दाखल झाली आहेत. हि तरंगे पाटो येथेच वास्तव्य करणार असून दुसऱया दिवशी म्हणजे आज रवि.  दि. 24 रोजी संध्याकाळी पुर्ववत माशेल येथे जाण्यास निघणार. यावेळी तरंगदेवता भाविक भक्तांना कौल देणार आहे.

Related Stories

कान्स चित्रपट महोत्सवात ‘इफ्फी’ पोस्टरचे अनावरण

Amit Kulkarni

जीसीएच्या आमसभेत क्रिकेट मैदानांच्या निर्मिती आणि अपग्रेडेशनवर भर

Patil_p

एमईएस स्टाफ को-ऑपरेटीव्ह सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Amit Kulkarni

फातोर्डा येथील गाडय़ाच्या विस्तारावर कारवाई

Patil_p

सिद्धेश नाईक बनले गोवा भाजपचे सचिव

Amit Kulkarni

गोमंतक मराठा समाज संस्थेतर्फे डॉ.रामकृष्ण मोरजकर यांना कै. भाऊसाहेब बांदोडकर स्मृती समाज भूषण पुरस्कार

Amit Kulkarni