Tarun Bharat

बायंगिणी कचरा प्रकल्प रद्द करावा

तृणमूल काँग्रेसचे समिल वळवईकर यांची मागणी

प्रतिनिधी / पणजी

बायंगिणी कचरा विल्हेवाट प्रकल्प म्हणजे ओल्ड गोव्यासह आजुबाजुच्या परिसरावरील एक मोठे संकट ठरणार असल्याने या प्रकल्पास स्थानिक ओल्ड गोव्याच्या नागरिकांसह तीन मतदारसंघातील लोक व लोकप्रतिनिधी 2004 पासून विरोध करत असून त्या मागची भावना तसेच वस्तुस्थिती काय आहे, हे जाणून घेऊन सरकारने हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी प्रदेश तृणमूल काँग्रेसचे संयुक्त संयोजक समिल वळवईकर  यांनी केली आहे.

 सरचिटणीस व्हिक्टर गोन्साल्विस आणि अविता बांदोडकर यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. वळवईकर म्हणाले की, गोव्यातील लोकांनी प्रस्तावित कचरा प्रकल्पाला 16 वर्षांहून अधिक काळ विरोध केला आहे. हा प्रकल्प युनेस्को मान्यताप्राप्त वारसा स्थळाजवळ आहे. अनेक नामवंत चर्च, मंदिर, मठ, शैक्षणिक संस्था त्या परिसरात आहेत. प्रकल्प प्रत्यक्षात साकारला तर तो आपल्या पर्यावरणाचा नाश तर करणारच, तर त्याचबरोबर आपण युनेस्कोची मान्यता देखील गमावू शकतो, असे वळवईकर म्हणाले.

प्रकल्पातून निर्माण होणारा घातक कचरा करमळीचे तळे प्रदुषित करु शकतो. कदंब पठार हे नैसर्गिक साधनसंपत्तीचे भंडार आहे. सांतआंद्रे, सांताक्रूझ आणि कुंभारजुवा यांसारख्या भागातील लोकांच्या सर्वांगीण कल्याणात हा प्रकल्प घातक ठरणार आहे. या परिसरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि राहणीमान बिघडवू शकतो. कुंभारजुवेचे माजी आमदार पांडुरंग मडकईकर, सांताप्रुझच्या, माजी आमदार स्व. व्हिक्टोरिया फर्नांडिस, सांत आंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा हे सारेजण सुरुवातीपासून लोकांबरोबर राहिले. आपणही 2005 पासून याविषयी लोकांबरोबर राहिले आहे. हा विषय राजकीय नसून सामाजिक स्वास्थ्याचा आहे, असेही वळवईकर म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कचरा व्यवस्थापनमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी सारासार विचार करुन हा प्रकल्प रद्द करावा. त्याचबरोबर मोठे कचरा प्रकल्प उभारण्यापेक्षा प्रत्येक पंचायत पातळीवर  गावचे स्वतःचे कचरा प्रकल्प व्हावे, यासाठी सरकारने प्रयत्न व मदत करावी. अशाप्रकारे कचऱयाचे विकेंद्रीकरण करणे योग्य आहे, असेही ते म्हणाले.

Related Stories

चंद्रकात कवळेकर यांनी केपे मतदार संघातून दाखल केला अर्ज

Abhijeet Khandekar

पेन्ह द फ्रान्समधील अतिक्रमणावर कारवाई

tarunbharat

प्रतापसिंह राणे यांना पुन्हा निवडणुकीत उतरण्याचा आग्रह

Amit Kulkarni

मुरगावात पालिका निवडणुक प्रचाराला जोर

Amit Kulkarni

राज्यात गुरुवारी 49 नवे रुग्ण

Omkar B

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे : सूर्याजिराव राणे

Amit Kulkarni
error: Content is protected !!