Tarun Bharat

C-17 विमानाच्या चाकांवर मानवी मृतदेहाचे अवशेष

Advertisements

ऑनलाईन टीम / काबुल :   

सोमवारी काबुलमधून उड्डाण केलेले अमेरिकेचे C-17 ग्लोबमास्टर विमान कतारला उतरले. या विमानाच्या चाकांवर मानवी मृतदेहाचे अवशेष आढळून आले आहेत. अमेरिकन हवाई दलाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या जाचक राजवटीत राहण्यापेक्षा अनेक नागरिक देश सोडत आहेत. त्यामुळे काबुल विमानतळावर नागरिकांची गर्दी होत आहे. सोमवारी काबुल विमानतळावर अमेरिकेचे C-17 ग्लोबमास्टर विमान दाखल झाले. या विमानातून जीवनावश्यक वस्तू अमेरिकेने पाठविल्या होत्या. मात्र, हे सामान विमानातून उतरविण्यापूर्वीच शेकडो अफगाणांनी विमानाला घेराव घातला आणि विमानात चढण्यासाठी रेलचेल सुरू झाली. अराजकसदृष्य स्थिती पाहता सी-17 च्या चालक दलाने विमानाचे लवकरात लवकर उड्डाण घेण्याचा निर्णय घेतला. उड्डाणानंतर हे विमान कतारला उतरले. तेव्हा विमानाच्या चाकांवर मानवी मृतदेहाचे अवशेष आढळून आले. या विमानात बसताना चेंगराचेंगरी झाल्यानंतर काही नागरिक विमानाच्या चाकांवर बसल्याचा दावा करण्यात आला असून, त्यांचे हे अवशेष असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Related Stories

कोरोना उगमस्रोताच्या चौकशीसाठी WHO चे पथक वुहानमध्ये

datta jadhav

चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या 84 हजार नव्हे तर 6 लाख 40 हजार

datta jadhav

म्यानमारमध्ये भूस्खलन 20 ठार, 70 बेपत्ता

Patil_p

जपानमध्ये परततोय किडे खाण्याचा ट्रेंड

Patil_p

उत्तर कोरियावर भडकला जपान

Amit Kulkarni

अमेरिकेच्या विद्यापीठात गोळीबार, 3 ठार

Amit Kulkarni
error: Content is protected !!