Tarun Bharat

शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यावर;मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार?

Maharashtra Cabinet Expansion : राज्यात युती सरकार अस्तित्वात आले मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. कालच राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या निरोपसमारंभासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शिंदे आणि फडणवीस दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.

न्यायालयाच्या निकालामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, असे कोणतेही कारण नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. आजच्या शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात यावर नेमकी काय चर्चा होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. स्नेहभोजनाचा कार्यक्रम सायंकाळी 7 ते 10 या वेळेत होणार आहे.स्नेहभोजन कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा होऊ शकते.

Related Stories

सातारा जिल्ह्यातून आज 69 जणांना डिस्चार्ज, कोरोनाचे 5 बळी

Archana Banage

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तास्थानांना सुरूंग लावणार

datta jadhav

एनआयएने कुठला जावई शोध लावला?

Patil_p

यंत्रमाग कामगाराचा मुलगा झाला ‘एअर फोर्स’ मध्ये गरुड कमांडो

Archana Banage

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, सिल्व्हर ओकवर आला फोन

datta jadhav

मुंबईत बाप्पांची जल्लोषात मिरवणूक

Patil_p