अध्यक्ष झेलेंस्की यांची घोषणा ः विदेश मंत्री बदलला जाणार
वृत्तसंस्था/ कीव्ह
रशियासोबतच्या युद्धादरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी लवकच्रा मंत्रिमंडळ फेरबदल करणार असल्याची घोषणा केली आहे. विदेश धोरण मजबूत करणे आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
झेलेंस्की यांच्या या घोषणेनंतर युक्रेनचे विदेशमंत्री बदलले जाऊ शकतात असे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वी झेलेंस्की यांनी भारतासह 9 देशांमधील स्वतःचे राजदूत हटविण्याचा निर्देश दिला होता.
तर दुसरीकडे युद्धाच्या 137 व्या दिवशी रशियाच्या सैनिकांनी युक्रेनच्या डोनेट्स्क शहरामधील एका अपार्टमेंटवर क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. या हल्ल्यात 29 जण मृत्युमुखी पडले आहेत. पोलिसांनी 24 मृतदेह ढिगाऱयाखालून बाहेर काढले ओत. तर 6 जखमींना वाचविले आहे.
डोनेट्स्कसह रशियाने सोमवारी खारकीव्ह शहरावरही तीन रॉकेट्स डागले आहेत. या हल्ल्यात किमान 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 30 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून रशिया खारकीव्ह आणि डोनेट्स्कवर कुठल्याही क्षणी कब्जा केल्याची घोषणा करू शकतो असे युक्रेनच्या आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱयाने सांगितले आहे.
रशियाचे नागरिकत्व स्वीकारा युक्रेनमध्ये रशियाचा प्रभाव वाढवू पाहणारे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी नवे पाऊल उचलले आहे. युक्रेनच्या सर्व लोकांना रशियाचे नागरिकत्व प्रदान करण्यासाठी त्वरित प्रक्रियेचा विस्तार करत एका आदेशावर पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे. आतापर्यंत युक्रेनच्या डोनेट्स्क, लुहान्स्क क्षेत्रासह दक्षिण जापोरिजिया आणि खेरसोन क्षेत्रातील लोकांनाच नागरिकत्व मिळविता येत होते. परंतु आता पूर्ण युक्रेनमधील लोक रशियाचे नागरिकत्व मिळवू शकणार आहेत. नव्या नियमानंतर पुतीन यांनी युक्रेनच्या सर्व नागरिकांना रशियाचे नागरिकत्व स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.