पणजी : आगामी जून महिन्यात नियोजित असलेल्या सुप्रिम ऑडिट इन्स्टिट्यूशन्स (एसएआय20) च्या शिखर परिषदेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारताचे नियंत्रण आणि महालेखापरिक्षक (कॅग) कार्यालयाचे सहा सदस्यीय शिष्टमंडळ संचालक (कर्मिक) विशाल देसाई यांच्या नेतृत्वाखाली गोव्याच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहे. 2023 साली भारत देशास जी 20 चे अध्यक्षपद लाभले आहे. यामुळे एसएआय 20 या संस्थेचे अध्यक्षपद भारताचे नियंत्रण आणि महालेखापरिक्षक हे भूषवित आहेत. याद्वारे भारतासह 20 सदस्य देशांमध्ये सार्वजनिक क्षेत्रात सुशासन आणि सार्वजनिक जबाबदारी या बाबींचा प्रसार करणे व त्यांना चालना देण्यासाठी भारतास चांगली संधी मिळाली आहे. जी20 परिषदेचा एक भाग म्हणून गोव्यात 12 ते 14 जून दरम्यान एसएआय 20 च्या दोन बैठकांचे नियोजन करण्यात येणार आहे. एसएआय 20 सदस्य देश आणि जागतिक बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये पहिली बैठक गुवाहाटी येथे मार्च 2023मध्ये पार पडली. शुक्रवारी गोवा सचिवलायमध्ये या शिष्टमंडळासमवेतची बैठक गोव्याचे शिष्टाचार सचिव आणि जी20 परिषदेसाठीचे नोडल अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. हे शिष्टमंडळ शनिवारपर्यंत गोवा दौऱ्यावर असून एसएआय 20 शिखर परिषदेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विविध हॉटेल, विमानतळ आणि परिषद ठिकाणांना भेट देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक तसेच एसएआय 20चे अध्यक्ष गिरीश चंद्र मुर्मू यांनी आगामी एसएआय बैठकांमध्ये सागरी जल अर्थव्यवस्था (ब्लू इकॉनॉमी) आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांचाही समावेश करण्यास सूचित केले आहे.
Previous Articleमडगाव-काणकोण मार्गावर अपघातांमुळे वाढता वाहतूक खोळंबा
Next Article जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत किशोर वालावलकर प्रथम !
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.