सीआयडीकडून 33 संशयितांना अटक ; राऊटरसह 26 संगणक, अन्य साहित्य जप्त,अटकेतील सर्वजण बिगर गोमंतकीय
पणजी : गोव्यात राहून अमेरिकेतील नागरिकांना ऑनलाईन लुटणाऱ्या टोळीचा गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) पर्दाफाश केला असून कोलवाळ येथे केलेल्या कारवाईत बनावट कॉल सेंटर चालविणाऱ्या 33 बिगर गोमंतकीयांना अटक केली आहे. त्यांच्याकडून राऊटरसह 26 संगणक तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात भादंसंच्या 419, 420 तसेच आयटी कायदा 66-सी, 66-डी कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुऊ होता. आतापर्यंत संशयितांनी कितीजणांना, किती कोटी ऊपयांना लुटले आहे याबाबत पोलीस तपास करीत आहेत. रायबंदर येथील सीआयडीच्या कार्यालयात काल मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सीआयडीचे अधीक्षक निधीन वालसन यांनी वरील माहिती दिली. त्यांच्या सोबत सीआयडीचे निरीक्षक व अन्य पोलीस उपस्थित होते.
कोलवाळ येथे होते कॉल सेंटर
वालसन पुढे म्हणाले की, ही कारवाई सोमवारी 11 एप्रिल रोजी रात्री 11. 45 ते पहाटे पाच वाजेपर्यंत करण्यात आली. कविश रेसिडेन्सी, कोलवाळ, बार्देश येथे संशयित बनावट कॉल सेंटर चालविण्यात येत होते. ही जागा म्हापसा येथील तारक आरोलकर यांची असून संशयितांनी जिगर परमार (गुजरात) या व्यक्तीच्या नावाच्या ही जागा भाड्याने घेतली होती.
अॅमेझॉनविषयी समस्या सोडवून देतो…
अॅमेझॉन ग्राहक सेवा केंद्राचे आपण कर्मचारी बोलत असल्याचे सांगून कोलवाळ येथील या सेंटरमधून अमेरिकेतील ग्राहकांना कॉल केले जायचे. अॅमेझॉन खरेदी विषयी आपली समस्या सोडवून देतो असे सांगून ग्राहकांकडून बँकेच्या तपशीलांसह ग्राहकांचे वैयक्तिक तपशील घेतले जात होते. समस्या सोडवून घेण्यासाठी ग्राहक संशयितांच्या खात्यात पैसे जमा करत होते, मात्र ग्रहकांच्या समस्या कधीच सुटल्या नाहीत. काहीवेळा हे संशयित अमेरिकेतील ग्राहकांना फोन कॉल करुन त्यांना माहिती देत होते की काही अज्ञात व्यक्तीने तुमचे अॅमेझॉन खाते हॅक करून इलेक्ट्रॉनिक महागड्या वस्तू खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे, असे सांगून ऑर्डर रद्द करण्यासाठी ग्राहकाचा लिंक फोन, बँक तपशील आणि इतर वैयक्तिक तपशील मिळवत होते. नंतर त्या माहितीद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जात असे. अटक केलेल्या संशयितामध्ये जिगर परमार (35 अहमदाबाद गुजरात), अभिनव सिंग (21 अलकापुरी रोड, नाला सोपारा पूर्व, मुंबई), गिरीश खरात, (24 संतऊषी रोड, मुंबई), पीटर डिसोझा (25 वेस्ट, मुंबई), नरेंद्र अजितसिंग राठोड, (52 अहमदाबाद, गुजरात), जुनेद अक्रम अली (22 मेघालय), प्रतिक राजकुमार चव्हाण (28 कांदिवली, पश्चिम, महाराष्ट), अझूंग रोंगमी (28 गुवाहाटी आसाम), सॅम्युअल लालरौतंगेटा सायलो (24 आयझॉल, मिझोराम), फर्नांडिस सायमलिच (24 मेघालय), पप्पा गोपाल दास (28 आसाम), तिशाय शोथून (26 शिलाँग, मेघालय), रोनाल्ड नोंगलांग, (24 शिलाँग, मेघालय), अँडरसन मार्वेन (23 शिलाँग, मेघालय), बारी रिचर्ड (24 शिलाँग मेघालय), चार्ल्स मारपना (24 लाँगपी, चिंगाई, मणिपूर), टी. थांगखानसुआन सिमटे (21 लंका, चुरारचनपूर, मणिपूर), मंगकारा मोंगऊम (25 मेघालय), थांगलिसे संगटम (20 मंगाखी, तुएनसुंग, नागालँड), पैला किटडोर मारिंग (23 नागालँड), शाऊख हुसेन (29 क्रॉस रोड, वांद्रे पश्चिम मुंबई), अमीर शेख (28 क्रॉस रोड धोबी घाट, मुंबई), जिपसांग लिंगडो (34 लबान मेघालय), दाम दुनई वंशीय डोनलांग बरे (23 मेघालय, शिलाँग), पीटर एल राउते (21 वर्षे, लायतुमखाराह, कॅथेडरल चर्चजवळ, मेघालय शिलाँग), किंगवांगली (26 गोराबत्ती, नागालँड), नेहा पवन कोठेकर (26 दादर मुंबई), लामे शोगप्पी (20 नागालँड), मीमी नोकलँग (19 नागालँड), आरेन झामिर (19 चुमुकेडिया मोकोचुंग नागालँड), लालबी कमाव्वीया (24 दिनथर वेंग, मिझोरम), संजनाकुमारी दिनेशकुमार (19 खारी हिल्स शिलाँग, मेघालय), जेसिका खियांगटे (26 व्हॅली, शिलॉन्ग, मेघालय) यांचा समावेश आहे. संशयितांना न्यायालयात हजर करून रिमांड घेतला जाईल.