Tarun Bharat

कॅमेरूनने सर्बियाला बरोबरीत रोखले

पिछाडीवरून कॅमेरूनने साधली बरोबरी

वृत्तसंस्था/ .अल वक्राह, कतार

अलेक्सांडर मित्रोविकने नोंदवलेल्या गोलनंतर सर्बियाने कॅमेरूनवर उत्तरार्धात सुरुवातीला 3-1 अशी भक्कम आघाडी घेतली होती. पण जिगरबाज कॅमेरूनच्या व्हिन्सेंट अबुबाकर व एरिक मॅक्झिम चूपो मोटिंग यांनी दोन मिनिटांत दोन आश्चर्यकारक गोल नोंदवून विश्वचषक स्पर्धेतील गट ग मधील ही लढत 3-3 अशी बरोबरीत सोडवत एक गुण वसूल केला.

एक गुण मिळाला असला तरी कॅमेरूनला आगेकूच करण्याची फारशी संधी नाही. तीच स्थिती सर्बियाचीही आहे. सर्बियाला मात्र या सामन्यात 3-1 अशी भक्कम आघाडी घेतली असतानाही विजय मिळविता आला नाही, यांची खंत वाटत असेल. पण अखेरीस हा सामना 3-3 असा बरोबरीत राहिला.

सर्बियाने पूर्वार्धातील इंज्युरी टाईममध्ये गोल नोंदवून 2-1 अशी आघाडी घेतली होती आणि उत्तरार्धात सुरुवातीलाच मित्रोविकने ती 3-1 अशी केली होती. नंतर  अबुबाकरने शानदार गोल नोंदवून सर्बियाची आघाडी 3-2 अशी कमी केली आणि नंतर चूपो मोटिंगने अगदी जवळून गोल नोंदवून कॅमेरूनला बरोबरी साधून दिली. अबुबाकरने गोल नोंदवला तेव्हा लाईन्समनने तो ऑफसाईड ठरविला. व्हीएआरमध्ये रिप्ले पाहिल्यानंतर हा गोल मंजूर करण्यात आला. कॅमेरूनचा पहिला गोल जीन चार्लस कॅस्टेलेटोने कॉर्नरवर नोंदवला. पॅव्हलोविकने सर्बियाला बरोबरी साधून दिल्यानंतर सर्जी मिलिन्कोविकने सर्बियाचा दुसरा गोल नोंदवून 2-1 अशी आघाडी मिळवून दिली होती.

Related Stories

साईराज चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Omkar B

महिलांच्या नेशन्स चषक हॉकी स्पर्धेला आज प्रारंभ

Patil_p

झगडणाऱया मुंबईसमोर आज बलाढय़ राजस्थानचे आव्हान

Patil_p

कोरोनामुळे लंकेतील टी-20 लिग स्पर्धा लांबणीवर

Patil_p

इटालियन ग्रां प्रि शर्यतीत मॅक्लारेनचा रिकार्दो विजेता

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत गोलंदाजच निर्णायक ठरतील

Patil_p