Tarun Bharat

पोतदार पॉलिटेक्निकचे गृहिणी-विद्यार्थ्यांसाठी शिबिर

प्रतिनिधी /बेळगाव

टिळकवाडी येथील वसंतराव पोतदार पॉलिटेक्निकमध्ये इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन तसेच कॉम्प्युटर सायन्स विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या संगणक प्रशिक्षण शिबिराची शनिवारी सांगता झाली. सहा दिवसांच्या या शिबिरामध्ये गृहिणी व लहान मुलांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान देण्यात आले.

गृहिणी तसेच लहान मुलांना संगणकाची माहिती व्हावी तसेच त्यांना संगणकाची हाताळणी करणे सोयीचे व्हावे या उद्देशाने कॉलेजने त्यांच्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला गृहिणी व लहान मुलांनी उत्तम प्रतिसाद दिला.

प्राचार्या श्रीदेवी मालाज यांनी या प्रशिक्षणार्थींचे कौतुक केले. सूत्रसंचालन सविता बागेवाडी यांनी केले. के. एस. भारती यांनी परिचय करून दिला. टी. वीणा यांनी आभार मानले.

Related Stories

आजपासून वीरराणी कित्तूर चन्नम्मा उत्सवाला प्रारंभ

Patil_p

महामार्गात जमीन गेलेल्या शेतकऱयांना न्याय मिळवून देवू

Patil_p

गुप्त माहिती मिळविण्यासंदर्भात पोलिसांनी गिरवले धडे

Tousif Mujawar

बसवेश्वर चौक अडकला समस्यांच्या विळख्यात

Amit Kulkarni

वेणुग्राम सायकल क्लबची सायकल फेरी

Amit Kulkarni

आनंदवाडीतील नागरिकांची मनपाकडे धाव

Patil_p