कोल्हापूर प्रतिनिधी
आमदार सतेज पाटील जिह्यातल्या सगळ्या सहकारी संस्था गिळंकृत करत चालले आहेत. हळूहळू या संस्था डबघाईला आणायच्या आणि मागच्या दाराने स्वामालकीच्या करायच्या हीच त्यांची कपटनिती आहे असा घणाघात खासदार धनंजय महाडिक यांनी केला.
हेही वाचा >>> नरके गट पैरा फेडणार! सतेज पाटील यांना नरके गट गटाचा पाठींबा
करवीर तालुक्यातील कांडगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू सहकार आघाडीची प्रचार सभा झाली याप्रसंगी खासदार महाडिक बोलत होते.
खासदार महाडिक म्हणाले, सभसदांना खोट्या आश्वासनांचे आमिष दाखवायचे आणि निवडणुका जिंकायच्या असा सतेज पाटील यांचा डाव आहे. गोकुळच्या निवडणुकीतही त्यांनी अशाच पद्धतीने सभासदांची दिशाभूल केली. निवडणुकीत त्यांनी दिलेली किती आश्वासने पूर्ण केली याचा विचार सभासदांनी करावा. तसेच गोकुळची आजा झालेली अवस्था पाहून सभासदांनी राजाराम कारखाना निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना साथ द्यावी, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले.
हेही वाचा >>> सभासद आणि कर्मचा-यांना सन्मानाची वागणूक देणार : आमदार सतेज पाटील
ते पुढे म्हणाले, शेतकरी संघाची जागा बळकावून संघाची वाताहत करण्यात सतेज पाटलांचा मोठा हात आहे. गावातील ज्येष्ठ सभासदांनी राजाराम कारखाना महाडिक यांच्या ताब्यात दिला असल्याने तो सहकारी राहिला आहे. विरोधकांच्या ताब्यात गेला असता तर तो कधीच संपला असता असा आरोप खासदार महाडिक यांनी केला. तसेच जो माणूस विनय कोरेंसारख्या जिह्याच्या नेत्याला दिलेला शब्द पाळत नाही तो तुम्हाला दिलेला शब्द काय पाळणार? असा सवालही त्यांनी सभासदांना केला.
यावेळी बाळासाहेब मेडशिंगे, वैष्णवी नाईक, मिनाक्षी पाटील, गोविंद चौगुले, सरपंच तेजस्विनी चव्हाण, हंबीरराव पाटील, दत्तात्रय मेडशिंगे, उदय चव्हाण, बाबुराव चव्हाण, सुकुमार पाटील, बंडोपंत घोसरवाडे, सदाशिव आणकर, शामराव तिबिले, हर्षद पाटील, शंकरराव नाईक, पांडुरंग नाईक, राजू नाईक यांच्यासह सभासद शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.