मुंबई
अमेरिकेतील एकंदर नकारात्मक वातावरणाचा परिणाम भारतीय रुपयावर जाणवत आहे. जाणकारांच्या मते येत्या काळात रुपया 84 ते 85 पर्यंत आणखी विक्रमी स्तरावर खाली येऊ शकतो. इलारा ग्लोबल रिसर्चने हा अंदाज नुकताच मांडला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ, व्यापारी वाढती तूट व विदेशी चलन साठय़ाची चिंता यामुळे रुपया डॉलरच्या तुलनेत दबावात आहे. तेव्हा ही परिस्थिती पाहता येत्या मार्चपर्यंत रुपया 84 ते 85 ची नीचांकी मजल मारू शकतो.