वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कॅनरा बँकेचा मार्च 2022 मध्ये समाप्त झालेल्या तिमाहीत निव्वळ लाभ हा दुपटीने वधारला आहे. यामध्ये मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत हा निव्वळ नफा 65 टक्क्यांनी वधारुन 1,666.22 कोटीवर पोहोचला आहे.
बँकेला या अगोदर आर्थिक वर्षाच्या समान कालावधीत 1,010.87 कोटी रुपयांचा निव्वळ लाभ झाला होता. बँकेने दिलेल्या माहितीनुसार 2021-22 च्या जानेवारी ते मार्च तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वधारुन 22,323.11 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे 2020-21 च्या समान कालावधीत 21,040.63 कोटी रुपये होते.