Tarun Bharat

कंत्राटी पद्धत रद्द करा, सेवेत कायमस्वरुपी घ्या!

रोजंदारीवर काम करणाऱया कंत्राटी कर्मचाऱयांचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कंत्राटी पद्धतीने काम करणाऱया सर्व कर्मचाऱयांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे. कंत्राटी कर्मचाऱयांना निवृत्तीवेतन द्यावे यासह इतर मागण्यांसाठी कर्नाटक राज्य कंत्राटी नोकर संघाच्यावतीने प्रांताधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरकारच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनेच आम्हाला नोकरीत सामावून घेतले जात आहे. कंत्राटी पद्धत कायमस्वरुपी रद्द करावी. कारण त्यामुळे आमच्या कुटुंबांवर अन्याय होत आहे. कंत्राटी पद्धतीने काम केल्यानंतर सरकारच्या कोणत्याच योजना आम्हाला लागू होत नाहीत. त्यामुळे कुटुंबीय वाऱयावर पडत आहेत. तेंव्हा कंत्राटी पद्धत रद्द करून नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

कंत्राटी कर्मचाऱयांना महागाई भत्ता दिला जात नाही. तो भत्ता द्यावा, घरभाडे द्यावे, याचबरोबर निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे पेन्शन द्यावी, अशी मागणीही या निवेदनात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आश्वासने दिली जात आहेत. मात्र सरकारने याबाबत पाऊल उचलले नाही. तेंव्हा तातडीने पाऊल उचला, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.यावेळी यल्लाप्पा चुन्नप्पण्णावर, रामचंद्र सोळंखी, एस. एल. सुगावी, आय. एल. सनदी, राजेंद्र कल्लूर, रवी बजंत्री, प्रशांत मुद्दी, सुमित्र शेटगे, रत्ना तुप्पदसह कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

म. ए. समिती सुरू करणार कोविड आयसोलेशन सेंटर

Rohan_P

पक्ष बळकटीसाठी संघटितपणे काम करा

Omkar B

मतमोजणी दिवशी परिसरातील वाहतूक मार्गात बदल

Amit Kulkarni

माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांचे निधन

Amit Kulkarni

अर्जुनराव गौंडाडकर यांचे निधन

Amit Kulkarni

कुर्ली ते नृसिंहवाडी पायी दिंडीचे प्रस्थान

Patil_p
error: Content is protected !!