आझम खान यांनी केली उमेदवाराची घोषणा
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशातील रामपूल लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकून आसिम राजा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आझम खान यांनी सप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवाराची घोषणा केली आहे. यापूर्वी रामपूरमध्ये आझम खान यांच्या पत्नी तंजीन फातिमा यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती.
आसिम राजा हे रामपूरचे पक्षाध्यक्ष आहेत. आसिम यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रामपूर आणि आझमगड लोकसभा मतदारसंघात 23 जून रोजी पोटनिवडणूक होणार असून 26 जून रोजी निकाल लागणार आहे.
आझमगड मतदारसंघात अखिलेश यादव तर रामपूर मतदारसंघात आझम खान यांनी राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक होणार आहे. दोन्ही नेत्यांनी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यावर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. अखिलेश हे मैनपुरीतील करहलमधून तर आझम खान रामपूरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
आझमगड मतदारसंघात सपकडून धर्मेंद्र प्रधान यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर या मतदारसंघात भाजपचे उमेदवार निरहुआ असणार आहेत. निरहुआ यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक आझमगड मतदारसंघातून लढविली होती, परंतु त्यांना अखिलेश यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.